ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. किशोर झाडेAgriculture Technology: भात रोप लागवडीसाठी रायडिंग टाइप रोवणी आणि वॉकिंग टाइप यंत्राचा वापर करतात. ज्यामुळे कामाला प्रचंड वेग येतो. यंत्रातील हायड्रोलिक सिस्टिममुळे चिखलाच्या खोलीनुसार उंची कमी-जास्त करणे शक्य होते, तर दोन रोपांमधील आणि ओळींमधील समान अंतरामुळे पिकाची वाढ जोमाने होते. .भात शेतीमध्ये चिखलणी, रोपवाटिका व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष रोवणी या प्रक्रियांवर एकूण उत्पादनाच्या ३० ते ३५ टक्के खर्च होतो. या सर्व श्रमाच्या कामांसाठी मजुरांची वेळेवर उपलब्धता होणे ही सध्या गंभीर समस्या बनली आहे. जेव्हा मजुरांअभावी रोवणीला उशीर होतो, ज्याचा थेट परिणाम भात उत्पादनावर होतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी भात रोवणी, कापणी आणि तण काढणी यांसारख्या कामांत सुधारित कृषी यंत्रांचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे केवळ मजुरांवरील अवलंबित्वच कमी होत नाही, तर उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन शेती अधिक फायदेशीर आणि वेळेवर पूर्ण होणारी बनते..यांत्रिकीकरणाचे फायदेभात शेतीमध्ये रायडिंग टाइप रोवणी आणि वॉकिंग टाइप यंत्राचा वापर करतात. ज्यामुळे कामाला प्रचंड वेग येतो व अचूक रोवणी करू शकते.यंत्रातील हायड्रोलिक सिस्टिममुळे चिखलाच्या खोलीनुसार उंची कमी-जास्त करणे शक्य होते, तर दोन रोपांमधील आणि ओळींमधील समान अंतरामुळे पिकाची वाढ जोमाने होते.पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत वेगाने काम करत असल्याने वेळेची मोठी बचत होते आणि मजुरांवरील अवलंबित्व कमी होऊन केवळ १ चालक व २ मदतनीसांच्या साह्याने काम पूर्ण होते..Agriculture Technology: शेतीमध्ये ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर.ओळीत लागवड केल्यामुळे हवा खेळती राहते, पर्यायाने रोगांचे प्रमाण कमी होऊन उत्पादनात वाढ होतो.शेतकऱ्याला वाकून रोवणी करावी लागत नसल्याने शारीरिक कष्ट व थकवा कमी होतो.या यंत्राच्या यशस्वी वापरासाठी पूर्वतयारी म्हणून प्लॅस्टिक पेपर किंवा ट्रे वर आधारित ‘मॅट नर्सरी’ तयार करणे आवश्यक असते. तसेच शेत व्यवस्थित चिखलणी करून सपाट केलेले असावे. रोवणीच्या वेळी शेतात साधारण १ ते २ इंच इतकेच पाणी राहील, याची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून रोपे जमिनीत व्यवस्थित बसतील..यंत्राचे मुख्य भागइंजिन : हे यंत्राचे भाग असून, जे संपूर्ण यंत्राला आणि रोवणीच्या यंत्रणेला शक्ती पुरवते.सीडलिंग ट्रे/प्लॅटफॉर्म : यंत्राच्या मागील बाजूचा हा मोठा झुकलेला भाग आहे, ज्यावर भात रोपांची ‘मॅट नर्सरी’ ठेवली जाते.ट्रान्सप्लांटिंग आर्म्स आणि फिंगर्स : हे सर्वांत महत्त्वाचे भाग आहेत. हे फिरणारे हात ‘मॅट नर्सरी’ मधील रोपे उचलून अचूकपणे चिखलात रुतवतात. रोपाची संख्या कमी जास्त करिता त्यामध्ये जुळवणी दिली आहे..रबर लग टायर्स : हे विशेष प्रकारचे टायर्स आहेत, जे चिखलात अडकत नाहीत आणि यंत्राला पुढे नेण्यास मदत करतात.फ्लोट बोर्ड : यंत्राच्या तळाशी असलेला हा लोखंडी पातळ बोर्ड आहे जो चिखलाचा पृष्ठभाग सपाट करतो, ज्यामुळे रोपे व्यवस्थित आणि समान खोलीवर लावली जातात.ड्रायव्हर सीट : ऑपरेटरला बसण्यासाठी जागा आणि जिथून तो संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवू शकतो.स्टिअरिंग व्हील : यंत्राची दिशा बदलण्यासाठी आणि ओळीत धान रोवणी करण्यासाठी याचा वापर होतो..Agriculture Technology: ॲग्रोव्होल्टेइक्स : शेती आणि सौर ऊर्जेचा संगम.हायड्रोलिक लीव्हर्स : यंत्राची खोली आणि ट्रेची हालचाल नियंत्रित करण्यासाठी या लीव्हर्सचा वापर केला जातो.सीडलिंग रॅक्स : काही यंत्र मध्ये यंत्राच्या बाजूला अतिरिक्त रोपांचे ट्रे ठेवण्यासाठी असलेली ही स्टँड्स असते.मार्कर : पुढील ओळ कुठून घ्यायची याचे मोजमाप करण्यासाठी यंत्राच्या बाजूला एक दांडा असतो..राइडिंग टाइप रोवणी यंत्राची रचनाया यंत्राचा मुख्य आधार म्हणजे त्याचे इंजिन, जे साधारणपणे १० ते १५ अश्वशक्तीचे असते. यंत्राला चिखलात चालण्यासाठी ‘रबर लग टायर्स’ किंवा लोखंडी चाके असतात, ज्यामुळे ते चिखलात यंत्र व्यवस्थित चालते.यंत्राच्या मागील बाजूस ‘सीडलिंग प्लॅटफॉर्म’ असतो, ज्यावर तयार केलेली भात रोपांची मॅट नर्सरी ठेवली जाते. ३) या प्लॅटफॉर्मच्या खाली ‘ट्रान्स्प्लांटिंग आर्म्स’ किंवा ‘फिंगर्स’ असतात, जे अगदी मानवी हातांप्रमाणे रोपे उचलून जमिनीत योग्य खोलीमध्ये रोवणी लावतात.यंत्राची उंची आणि रोवणीची खोली नियंत्रित करण्यासाठी यात हायड्रोलिक सेन्सर सिस्टीम असते. तसेच चालकासाठी आसन आणि यंत्राची दिशा बदलण्यासाठी स्टिअरिंग किंवा लीव्हर्सची सोय केलेली असते..वॉकिंग टाइप भात रोवणी यंत्रहे यंत्र लहान शेतजमिनीसाठी उपयुक्त व एक सुटसुटीत आणि कार्यक्षम यंत्र आहे. यामध्ये चालकाला यंत्राच्या मागे चालावे लागते. या यंत्राची रचना ‘फ्लोट’ वर आधारित असते, ज्याच्या पुढील भागात साधारण ४ ते ६ एचपी क्षमतेचे इंजिन आणि मागे गिअर बॉक्ससह दोन रबर चाके दिलेली असतात.यंत्राच्या मागील बाजूस असलेल्या हँडलवर सर्व नियंत्रण प्रणाली उपलब्ध असतात, ज्याद्वारे ऑपरेटर यंत्राची दिशा, वेग आणि रोवणीची खोली नियंत्रित करतो. यामध्ये रोपे ठेवण्यासाठी एक तिरपा ‘सीडलिंग ट्रे’ असतो आणि त्याच्या खालील ‘फिंगर यंत्रणा’ ट्रेमधील रोपे उचलून अचूकपणे चिखलात रोवण्याचे काम करते. जास्तीची रोपे सोबत नेण्यासाठी इंजिनच्या वरच्या बाजूला एक वेगळा माउंटेड ट्रे दिलेला असतो..तांत्रिकदृष्ट्या हे यंत्र एकाच वेळी चार ओळींमध्ये रोवणी करते, ज्यामध्ये दोन ओळींमधील अंतर ३० सेंमी स्थिर असते, तर दोन रोपांमधील अंतर यंत्राच्या सेटिंगनुसार १६ ते २२ सेंमी पर्यंत बदलता येते.यंत्राची कार्यक्षमता साधारण ०.३२ ते ०.५२ एकर प्रति तास इतकी असून ते वजनाने हलके असल्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात नेणे अत्यंत सोपे जाते.या यंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी १० ते १५ दिवसांची ‘मॅट नर्सरी’ तयार करणे आणि शेतामध्ये योग्य प्रकारे चिखलणीकरून सपाट ठेवणे आवश्यक आहे.ज्ञानेश्वर ताथोड ९६०४८१८२२०(कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, जि. गडचिरोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.