Amla Processing : आवळ्यातील बिया काढण्यासाठी हस्तचलीत यंत्र

लुधियाना येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाने आवळ्यातील बिया वेगळ्या करण्यासाठी हस्तचलित यंत्र विकसित केलय.
Manual machine for extracting amla seeds.
Manual machine for extracting amla seeds.Agrowon

Amla Processing Machine: प्रक्रिया उद्योगात विविध यंत्राचा वापर होत असतो. जेव्हा प्रक्रिया उद्योग (Processing implements) लघु स्तरावर किंवा घरगुती स्तरावर असतो तेव्हा मोठमोठी आणि महागडी यंत्र घेण परवडणार नसत.

आवळा प्रक्रिया उद्योगात कॅडी (Candy), सुपारी, लोणच तसच सरबत करताना बऱ्याच महिला पारंपारिक विळी अथवा चाकूचा वापर करतात.

आवळ्यात असलेल्या आंबटपणामुळे आवळा कापताना त्वचा काळी पडते. विळीच्या किंवा चाकूच्या वापरामुळे हाताला दुखापत होण्याची शक्यता असते.

या कामांमध्ये महिलांचा बराच वेळ खर्च होतो.यावर उपाय म्हणून लुधियाना येथील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाने आवळ्यातील बिया वेगळ्या करण्यासाठी हस्तचलित यंत्र विकसित केलय.

या यंत्राचा वापर करून आवळ्यातील बिया अगदी सहजपणे काढता येतात. पारंपारिक पद्धतीपेक्षा जवळ जवळ तिप्पट वेगान या यंत्रामुळे काम होतं.

महिलांच्या हाताचा संपर्क जास्त न आल्यामुळे हात काळे पडत नाहीत. महिलांचे श्रम कमी होतात त्यामुळ हे यंत्र आवळा प्रक्रिया उद्योगात महत्वाच आहे.

Manual machine for extracting amla seeds.
Amla Processing : आवळा कॅन्डी कशी करावी?

यंत्राचे फायदे काय आहेत?

कामाची गती वाढते.

यंत्र स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे स्वच्छ करण्यासाठी सोपे आहे शिवाय ते गंजतही नाही. 

यंत्राचा आकार लहान असल्यामुळे कुठेही ठेवून काम करता येतं.

यंत्राच्या सहाय्याने मध्यम आकाराच्या आवळ्यातील बिया सहज निघतात. 

पारंपरिक पद्धतीमध्ये आवळा कापल्यानंतर हात काळे पडतात परंतु मशीनच्या सहाय्याने काम केले असता हाताला आवळ्याचा जास्त स्पर्श होत नाही. त्यामुळे हात सुरक्षित राहतात. 

Manual machine for extracting amla seeds.
Amla Processing : घरगुती स्तरावर बनविली पौष्टिक आवळा कॅंन्डी

हाताला दुखापत होण्याची किंवा हात कापण्याची भीती नसते. 

आवळे वेळीन कापल्यामुळे बियांचा पूर्ण गर निघत नाही बराचसा गर वाया जातो. 

यंत्र वापरल्यामुळे बियांना चिकटलेला जास्तीत जास्त गर निघतो. 

गर वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. 

यंत्र हस्तचलित असल्यामुळे विजेची आवश्यकता नाही. 

मशीन वापरल्यामुळे काम जलद होते. कमीत कमी मजूर लागतात. 

त्यामुळे घरगुती स्तरावर आवळा प्रक्रिया उद्योग करणाऱ्या महिलांनी आवळ्यातील बिया काढण्याच्या यंत्राचा वापर करावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com