
जर्मनी येथील इलेब्निझ इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट जेनेटिक्स अॅण्ड क्रॉप प्लँट रिसर्च येथील शास्त्रज्ञ गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गहू उत्पादनाच्या (Environment Friendly Wheat Production) उद्देशाने नव्या जातींचा विकास (Wheat Verity) करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रक्रियेमध्ये गहू पिकाची (Wheat Crop) जैवविविधता आणि त्यातील जनुकीय गुणधर्मांची माहिती अत्यंत मोलाची ठरणार आहे.
नव्या जातींच्या विकासासाठी रोग, कीड आणि वातावरण बदलाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी मदत करणारी जनुके जुन्या आणि जंगली गहू जातींमध्ये शोधली जात आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर जेनेटिक्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
कोणत्याही पिकाच्या विविध जातीमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. त्यातील काही चांगले, तर काही वाईट असू शकतात. पिकाच्या उत्पादन आणि अन्य पोषक गुणधर्माला बाधा आणणारे वाईट गुणधर्म कमी करण्याच्या उद्देशाने सातत्याने संशोधन केले जाते. पूर्वी नव्या जातींच्या विकासासाठी पारंपरिक निवड पद्धती, संकराच्या पद्धती वापरल्या जातात. त्यात आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार जनुकीय माहितीचा सुयोग्य वापर करणाऱ्या पद्धतींची भर पडली आहे.
त्यामुळेच पिकांच्या जनुकीय माहिती साठ्याला प्रचंड महत्त्व आलेले आहे. या जनुकीय माहितीमध्ये प्रत्येक पिकांच्या जैवविविधतेचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. खरेतर तेच आपले वैभव ठरणार आहे. हे वैभव जपून त्याचा नव्या जातींच्या विकासामध्ये फायदा करून घेण्याच्या उद्देशाने आंतरशाखीय संशोधकांचा गट कार्यरत झाला आहे.
गहू पिकासंदर्भात काम करणाऱ्या गटामध्ये पीक पैदासकार, वनस्पती जनुकशास्त्रज्ञ, रोगशास्त्रज्ञ आणि जैवमाहितीशास्त्र शाखेचे संशोधक कार्य करत आहेत. ते प्रामुख्याने गव्हाच्या जुन्या जातीमध्ये असलेल्या पिवळ्या तांबेरासाठी असलेली प्रतिकारशक्ती आणि उत्पादकता यांचा अभ्यास करत आहेत. त्याविषयी माहिती देताना डॉ. अल्बेर्ट शुल्थेस यांनी सांगितले, की अत्यंत प्राचीन काळापासून गहू पीक घेतले जात असून, त्या जातीमध्येही अनेक चांगले गुणधर्म होते. मात्र त्याचा माहितीसाठाच आपल्याकडे आज उपलब्ध नाही.
अशा जुन्या जातीतील चांगल्या गुणधर्म, उत्पादन आणि अन्य वैशिष्ट्ये यांची माहिती जाणून घेण्यात आहे. कारण आता संकराच्या पद्धतीने पूर्वीच्या अनेक जातींचे बियाणे नष्ट होत चालले आहे. तसेच त्यांच्या लागवडीही होत नाहीत. पूर्वी संकरित जातीच्या विकासावेळीच मूळ जातींमधील केवळ उत्पादकतेकडेच लक्ष दिले असण्याची शक्यता अधिक आहे.
त्यातील अन्य गुणधर्मांचा विशेषतः वातावरणातील बदलांशी सामना करण्याची क्षमता, रोग किडींविषयीची प्रतिकारशक्ती इ. यांचा विचार या टप्प्यात केला जात आहे. या संशोधनासाठी गेल्या सहा वर्षांपासून फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्चकडून आर्थिक निधी उपलब्ध केला जात आहे.
पर्यावरणपूरक शेतीमध्ये कमीत कमी किंवा शून्य कीडनाशकांचा वापर हे आपले ध्येय असले पाहिजे. कारण त्यांच्या वापरामुळे अन्य कीटक प्रजाती, परागवाहकांच्या प्रजाती धोक्यात येत आहेत. तसेच माती, पाणी आणि हवा असे नैसर्गिक स्रोतही प्रदूषित होत आहेत. हे रोखण्यासाठी निसर्ग आणि त्यातील घटकांची अत्यंत सखोल माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्याला जुन्या व जंगली जाती महत्त्वाच्या ठरणार आहेत. उदा. गहू पिकामध्ये तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची समस्या आता जागतिक झाली आहे.
गहू जातींमधील प्रतिकारशक्तीबाबतची जनुके जाणून घेण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रो. डॉ. जोचेन रैफ यांनी दिली.गहू पिकासंदर्भात काम करणाऱ्या गटामध्ये पीक पैदासकार, वनस्पती जनुकशास्त्रज्ञ, रोगशास्त्रज्ञ आणि जैवमाहितीशास्त्र शाखेचे संशोधक कार्य करत आहेत. ते प्रामुख्याने गव्हाच्या जुन्या जातीमध्ये असलेल्या पिवळ्या तांबेरासाठी असलेली प्रतिकारशक्ती आणि उत्पादकता यांचा अभ्यास करत आहेत. त्याविषयी माहिती देताना डॉ. अल्बेर्ट शुल्थेस यांनी सांगितले, की अत्यंत प्राचीन काळापासून गहू पीक घेतले जात असून, त्या जातीमध्येही अनेक चांगले गुणधर्म होते. मात्र त्याचा माहितीसाठाच आपल्याकडे आज उपलब्ध नाही.
अशा जुन्या जातीतील चांगल्या गुणधर्म, उत्पादन आणि अन्य वैशिष्ट्ये यांची माहिती जाणून घेण्यात आहे. कारण आता संकराच्या पद्धतीने पूर्वीच्या अनेक जातींचे बियाणे नष्ट होत चालले आहे. तसेच त्यांच्या लागवडीही होत नाहीत. पूर्वी संकरित जातीच्या विकासावेळीच मूळ जातींमधील केवळ उत्पादकतेकडेच लक्ष दिले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यातील अन्य गुणधर्मांचा विशेषतः वातावरणातील बदलांशी सामना करण्याची क्षमता, रोग किडींविषयीची प्रतिकारशक्ती इ. यांचा विचार या टप्प्यात केला जात आहे. या संशोधनासाठी गेल्या सहा वर्षांपासून फेडरल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्चकडून आर्थिक निधी उपलब्ध केला जात आहे.
पर्यावरणपूरक शेतीमध्ये कमीत कमी किंवा शून्य कीडनाशकांचा वापर हे आपले ध्येय असले पाहिजे. कारण त्यांच्या वापरामुळे अन्य कीटक प्रजाती, परागवाहकांच्या प्रजाती धोक्यात येत आहेत. तसेच माती, पाणी आणि हवा असे नैसर्गिक स्रोतही प्रदूषित होत आहेत. हे रोखण्यासाठी निसर्ग आणि त्यातील घटकांची अत्यंत सखोल माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्याला जुन्या व जंगली जाती महत्त्वाच्या ठरणार आहेत. उदा. गहू पिकामध्ये तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावाची समस्या आता जागतिक झाली आहे. गहू जातींमधील प्रतिकारशक्तीबाबतची जनुके जाणून घेण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रो. डॉ. जोचेन रैफ यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.