Fruit Harvesting Tools : फळे काढणीची अवजारे

Agriculture Harvesting : राज्यात फळे आणि भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात असली, तरी आजही काढणीसाठी प्रामुख्याने पारंपरिक साधने आणि मनुष्यबळावर अवलंबून आहोत.
Agriculture Harvesting
Agriculture HarvestingAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : महाराष्ट्र हे देशातील फलोत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात विविध फळांचे उत्पादन सुमारे १५२ लाख टन नोंदविले गेले. २०२२-२३ मध्ये राज्यात ११.३५ दशलक्ष हेक्टर जमिनीवर सुमारे २०५ दशलक्ष मेट्रिक टन भाजीपाल्याचे उत्पादन घेतले होते राज्यात फळे आणि भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात असली, तरी आजही काढणीसाठी प्रामुख्याने पारंपरिक साधने आणि मनुष्यबळावर अवलंबून आहोत.

हाताने तोडणी करण्यामुळे माणसांची कार्यक्षमता कमी होते. काही फळे ही अधिक उंचावरून काढावी लागतात. अशा स्थितीमध्ये झाडावर चढून फळांची काढणी करताना अपघाताची शक्यता वाढते. त्याच प्रमाणे फळे उंचीवरून खाली जमिनीवर पडल्यामुळे नुकसानही होते. हे टाळण्यासाठी साध्या सोप्या काढणी साधनांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

त्यामुळे माणसांची श्रम कमी होतात. परदेशामध्ये सफरचंद, लिची, ऑलिव्ह या सारख्या फळांची काढणी करण्यासाठी स्वयंचलित उपकरणे वापरली जातात. आजही भारतात हस्तचलित साधनेच अधिक वापरली जात आहेत. त्यापैकी काही उपयुक्त साधनांची माहिती घेऊयात.

Agriculture Harvesting
Agriculture Harvesting : पाच जिल्ह्यांत गहू वगळता ज्वारी, हरभरा, करडईची काढणी पूर्ण

चिकू झेला :

चिकू हे फांदीच्या टोकाला येत असतात. फांदीवर चढून चिकू काढणे अवघड असते. तसेच फांद्यांना हेलकावे बसून कच्ची फळेही तुटून खाली पडण्याचा धोका असतो. त्यामुळेच चिकू झाडावरून काढणे हे थोडे जिकिरीचे काम मानले जाते. स्थानिक पद्धतीने तारेपासून तयार केलेले झेले चिकू काढण्यासाठी शेतकरी वापरत असतात.

अशाच प्रकारचे पण अधिक कार्यक्षम असा अतुल चिकू झेला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केला आहे. झेला वजनाला हलका असून, सहज हाताळता येतो. प्रचलित झेल्याच्या तुलनेमध्ये अधिक (प्रति तास १५० फळे) काढणे शक्य होते. यामध्ये फांद्यांना हिंदोळा बसत नाही आणि फळ झडून होणारे नुकसान टळते. त्याची किंमतही कमी आहे.

अंजीर काढणी साधन :

अंजीर हे एक नाजूक फळ असून, प्रामुख्याने हाताने तोडले जाते. मात्र अंजीर तोडतेवेळी त्यातून निघणाऱ्या चिकामुळे डाग पडतात. हाच चीक हातालाच चिकटून त्वचेला इजा होऊ शकते. परिणामी अंजीर तोडणी करण्यासाठी मजूर तयार होत नाहीत किंवा जादा मोबदला मागतात. हे लक्षात घेता अंजिराची तोडणी करण्यासाठी मनुष्यचलित ‘फुले अंजीर प्लकर’ विकसित करण्यात आला आहे.

या प्लकरमुळे दुरूनच अंजीर तोडले आणि पकडले जाते. या कामासाठी या अवजारामध्ये साप पकडण्याच्या कैचीप्रमाणे रचना केलेली असते. तोडणीनंतर अंजीर फळ देठाजवळ धरून ठेवले जाते. फळावर कोणताही दाब पडत नाही की इजा होत नाही. हाताला चिकाचा स्पर्श होत नाही. या साधनाच्या मदतीने एक माणूस ताशी २७ किलो अंजीर फळांची तोडणी करू शकतो.

Agriculture Harvesting
Okra Harvesting : जळगावात भेंडी पिकात काढणीला गती

आंबा झेला :

आंब्याचे फळ देठ विरहित निघाल्यास फळाला जखम होते आणि या जखमेद्वारे फळास सूक्ष्म जिवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ते फळ देठाच्या ठिकाणी सडून जाते अथवा देठ मोडलेल्या ठिकाणी बाहेर येणारा चीक फळावर पसरून काळे डाग पडतात. सध्या वापरात असलेल्या झेल्याने आंब्याचे फळ ओढून तोडले जाते.

त्यामुळे जवळपास ८० ते ८५ टक्के फळे देठाविरहित निघतात. तसेच ५-७ फळे फांदीला मिळालेल्या हिंदेळ्यामुळे खाली पडून वाया जातात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंबे काढण्यासाठी सुधारित नूतन झेला विकसित केला आहे. या झेल्याला दोन धारदार पाती व एक फिरती चकती आणि विभाजक असल्यामुळे नेहमीच्या झेल्याप्रमाणे झेला वर घेऊन त्या मध्ये आंब्याचे फळ घेऊन ओढल्यास आंब्याचा देठ धारदार पाते आणि दातेरी चकती यामध्ये येतो व कापला जातो.

अशा तऱ्हेने देठासहीत आंब्याचे फळ अलगद जाळीमध्ये येते. यामध्ये फांद्यांना हिंदोळा बसत नाही आणि फळ झडून होणारे नुकसान टळते. फांद्यांना इजा न होता, प्रचलित झेल्यापेक्षा जादा फळे निघू शकतात. या झेल्याने प्रति तास १३० फळे देठासहित काढता येतात.

भेंडी प्लकर :

फळाप्रमाणे फळभाज्या तोडणे हे जिकिरीचे काम आहे. त्यातही भेंडीवर असलेल्या बारीक लवेमुळे हाताची जळजळ होते. अधिक वेळ भेंडीची काढणी करताना लव हाताला चिकटून त्वचेला इजाही होते. भेंडीच्या तोडणी मजूर मिळत नाहीत किंवा अधिक मोबदला द्यावा लागतो. त्याच प्रमाणे काढतेवेळी भेंडीची लव निघून गेल्यामुळे चकाकी आणि प्रतही कमी होते.

या दोन्ही समस्या कमी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात हस्तचलित ‘फुले भेंडी प्लकर’ तयार केला आहे. कमी किमतीचे, वजनाला हलके असे हे साधन आहे. अर्गोनॉमिक डिझाईनने बनविलेला असल्याने एकाच वेळी दोन्ही हातांनीही प्लकरचा वापर करणे शक्य आहे. भेंडी तोडताना हाताचा स्पर्श होत नाही. तसेच कामाचा वेगही वाढतो. भेंडीवरील लव आणि चकाकी जपली जात असल्याने बाजारातही चांगला दर मिळू शकतो. विशेषतः निर्यातीसाठी भेंडी तोडणीसाठी हे साधन महत्त्वाचे ठरते.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९, (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com