
बुलडाणा ः एखादे छोटे तंत्रज्ञानही (Agriculture Technology) किती फायदेशीर ठरू शकते, याचा अनुभव यावर्षी बीबीएफ (BBF Technique) (रुंद, सरी, वरंबा) (Broad Bed Furrow Technique) तंत्राने लागवड केलेले अनेक शेतकरी घेत आहेत. जास्त पाऊस होऊनही या शेतकऱ्यांची पिके दमदार असून पारंपरिक पीक लागवड (Traditional Crop Cultivation) केलेल्यांच्या तुलनेत नुकसानीचे प्रमाण खूप कमी आहे. रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड केलेल्या शेतांमध्ये पाणी न साचता सरीतून अतिरिक्त पाणी वाहून गेले. यामुळे पिकाला फटका बसला नाही.
जिल्ह्यात या वर्षात बुलडाणा तालुक्यात ६१५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. मेहकर तालुक्यात साडेपाचशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लोणार तालुक्यातही पावणेपाचशे मिलिमीटरपर्यंत पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. या सलग पावसामुळे पिके पिवळी पडली. काही ठिकाणी सतत पाण्यात राहिल्याने पिके कुजलीसुद्धा. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनची सर्वाधिक साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. जास्त पाऊस होऊनही बेडवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना फारसे नुकसान झालेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यांच्या शेतांमधील पिके अधिक जोमदारपणे वाढीला लागलेले आहेत. दुसरीकडे पारंपरिक पद्धतीची लागवड असलेल्या शेतांमधील पिकांची वाढ तुलनेने कमी दिसत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.