Biogas Production : आधुनिक तंत्राद्वारे झाली बायोगॅस निर्मिती सोपी

Modern Agriculture Technology : सातारा जिल्ह्यातील हिंगणगाव येथील दीपक घाडगे यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देऊन उत्पन्नाचा आधार दिला आहे. याच व्यवसायामुळे त्यांना आधुनिक बायोगॅस युनिट उभारता आले.
Biogas Production : आधुनिक तंत्राद्वारे झाली बायोगॅस निर्मिती सोपी
Published on
Updated on

Sustainable Energy Solutions : सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पश्चिम भाग दुष्काळी आहे. त्यामुळे या परिसरात शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तालुक्यातील हिंगणगाव येथील दीपक हिरालाल घाडगे यांची साडेचार एकर शेती आहे. शेतीला जोड म्हणून त्यांनीही दुग्ध व्यवसाय आकारास आणला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे दहावीच्या शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली. काही काळ तेथे नोकरी केल्यावर २०१० मध्ये ते कायमचे गावी परतले. त्यानंतर पूर्णवेळ शेती करण्यास सुरवात केली. घरी एक दोन म्हशी होत्या. धोम-बलकवडी कॅनॉल व विहिरीच्या पाण्यावर ते ऊस, कांदा, भाजीपाला, चारा पिके घेत होते. कोरोना काळात शेतमाल विक्रीची व्यवस्था बिघडली. त्यात नुकसान सोसावे लागले. पिके सोडून द्यावी लागली.

Biogas Production : आधुनिक तंत्राद्वारे झाली बायोगॅस निर्मिती सोपी
Biogas Production : कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीच्या मार्गदर्शक सूचना जारी

व्यावसायिक दृष्ट्या दुग्धव्यवसाय

कोरोना काळात, दुष्काळात आणि प्रत्येक उन्हाळ्यात दीपक यांना दुग्ध व्यवसायानेच तारून नेले आहे. त्यामुळेच याच व्यवसायाचा विस्तार करण्याचे त्यांनी ठरविले. त्या दृष्टीने परिसरातील मुक्त संचार गोठे तसेच फलटण येथील गोविंद मिल्क डेअरीच्या वतीने प्रशिक्षणे, सहली आदींच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी सुरू केली.

व्यावसायिकदृष्ट्या दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. घराशेजारील मोकळ्या जागेत ५० बाय ४० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा बांधला. तसेच बांधीव शेडही उभारले. मोठा डामडौल न करता कमी खर्चात गोठा उभारणीला महत्त्व दिले. मुक्त संचार गोठ्यात कुक्कुटपालनही केले आहे,

अर्थकारण उंचावले

टप्प्याटप्प्याने पशुधन वाढवत नेले. आजमितीला १० एचएफ गायी, दोन म्हशी व एक खिलार देशी गाय असे पशुधन दावणीला आहे. प्रति दिन ४० ते ४५ लिटर दुधाचे संकलन होते. गोविंद डेअरी येथे दुधाचा पुरवठा होतो. प्रति लिटरला ३० ते ३५ रुपये तर सर्वाधिक ४२ रुपये लिटर दर मिळतो. या व्यवसायातून घाडगे कुटुंबाचे अर्थकारण उंचाविण्यास मदत झाली आहे. चाऱ्यासाठी मुरघास युनिटही उभारले असून त्यातून १५ ते २० टन टन चारा तयार केला जातो.

Biogas Production : आधुनिक तंत्राद्वारे झाली बायोगॅस निर्मिती सोपी
Biogas Plant : वर्षभरात उभारणार दोन हजार सातशे बायोगॅस सयंत्र

आधुनिक बायोगॅस युनिट

अलीकडील काळात पशुपालक शेण, गोमूत्र यांचा वापर करून शेताला स्लरी देण्याचे तंत्रज्ञान वापरू लागले आहेत. दुग्ध व्यवसायातून उपलब्ध होत असलेल्या शेणापासून बायोगॅस (जैवइंधन) निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. बदलत्या काळानुसार त्यातील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. त्याच अनुषंगाने इंधनात स्वयंपूर्ण होण्याची दिशा दीपक यांना मिळाली.

त्यासाठी गोविंद डेअरीची योजना व त्या अंतर्गत आधुनिक, पर्यावरणपूरक बायोगॅस युनिटची (बायो डायजेस्टर) माहिती मिळाली. त्याचे अर्थकारण तपासून दीपक यांनी डेअरीचे प्रकल्प व्यवस्थापक शिवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतात हे युनिट बसवले, मागील दोन वर्षांपासून कुटुंबाला त्याचा फायदा होऊ लागला आहे. युनिट उभारण्यासाठी ४९ हजार रुपये खर्च होता. मात्र दीपक यांना योजनेमुळे अवघे पाच हजार रुपये त्यासाठी द्यावे लागले. या युनिटमध्ये गॅस शेगडी, फिल्टर, टब आदी साहित्याचा समावेश आहे.

बायोगॅस युनिटची कार्यपद्धती, फायदे

गोठ्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेत युनिट बसविले आहे. दररोज १५ ते २० किलो शेणखत व ७० ते ८० लिटर पाणी या युनिटला द्यावे लागते. कुटुंबात दीपक, आई, वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे सात सदस्य आहेत. या सर्वांचा सकाळचा चहा, नाश्‍ता, दोन वेळचा स्वयंपाक याच इंधनावर होतो.

जुलै, ऑगस्टचा पावसाळ्याचा काही काळ वगळता वर्षातील दहा महिने पूर्ण क्षमतेने बायोगॅस मिळतो. एकावेळी सुमारे चार तास बायोगॅस चालवता येतो. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया होऊन संध्याकाळसाठी इंधन उपलब्ध होते. दीपक सांगतात की पूर्वी त्यांना महिन्याला एक एलपीजी सिलिंडर लागायचे. आता मागील दोन वर्षांत केवळ दोन सिलिंडरची गरज भासली. पैशांमध्ये सांगायचे तर वर्षभरात दहा हजार रुपये, तर दोन वर्षांत सुमारे वीस हजार रुपयांची बचत झाली आहे.

शिवाय युनिटमधून बाहेर पडणारी शेणस्लरी शेतीसाठी खत म्हणून उपयुक्त ठरते. त्यातून रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्च कमी झाला आहे. मागील दोन वर्षांत देखभाल खर्चही शून्य आला आहे. युनिट उभारण्यासाठी जागाही कमी लागते. पूर्वीच्या पारंपरिक युनिटच्या तुलनेत साहित्य उभारणीचा खर्चही कमी असल्याचे दीपक यांनी सांगितले. शेतीत त्यांना पत्नी रेश्मा व वडिलांची मोठी मदत होते.

दीपक घाडगे ७७५७९१५५७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com