Ahilyanagar News : इंधनाची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात राज्यात (२०२४-२५) या वर्षात राज्यात २ हजार सातशे बायोगॅस संयंत्र उभारणी झाली आहे. यावर बांधकाम, शौचालय अनुदानावर कोट्यवधींचा खर्च केला जाणार आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार करता प्रतिसाद कमी झाल्याने उद्दिष्ट कमी झाले आहे.
पशुपालक शेतकऱ्यांच्या इंधनात बचत व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी सर्वसाधारण गट व अनुसूचित जाती, जमाती अशा प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. पूर्वी १२ हजार आणि १३ हजार व शौचालय बांधणीसाठी १६०० रुपये प्रती युनिट अनुदान दिले जात होते.
आता अनुदानात बदल केला असून बांधकाम घनमीटर नुसार अनुदान दिले जात आहे. याशिवाय बायोगॅस संयंत्राला जोडून शौचालय उभारणीसाठी १ हजार ६०० रुपयाचे अनुदान दिले जाते. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत हा बायोगॅस संयंत्र उभारणीचा उपक्रम राबवला जातो. यंदा सर्वसाधारण गटात २ हजार १००, अनुसूचित जाती गटात ४०० हजार व अनुसूचित जाती-जमाती गटात २०० असे दोन हजार सातशे बायोगॅस सयंत्र उभारणीचे नियोजन केले आहे.
यंदा केवळ ७५ संयंत्राला शौचालय जोडली जाणार आहेत. साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी ग्रामीण भागात बायोगॅस उभारणीला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र अलीकडच्या दोन वर्षांत प्रतिसाद काहीसा कमी झाला आहे. वेळेवर अनुदान मिळत नसल्याचे एक कारण आहे. २०२१-२२ यावर्षी ७ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट होते. २०२२-२३ व २०२३-२४ वर्षात उद्दिष्ट कमी केले आहे. यंदाही उद्दिष्टात घट केली आहे. पाच वर्षांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात ७०० बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट होते. यंदा २५२ चे उद्दिष्ट आहे. राज्यात यंदा कोल्हापुर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक उद्दिष्ट आहे.
अशी होणार जिल्हानिहाय बायोगॅस संयंत्र उभारणी
ठाणे : १०, पालघर : ७३, रायगड : ५०, रत्नागिरी : ५०, सिंधुदुर्ग : १००, नाशिक : १०५, धुळे : १६, नंदुरबार : १५, जळगाव : २०, अहिल्यानगर : २५२, पुणे : ३९५, सातारा : ५०, सांगली : ९२, सोलापुर : १००, कोल्हापुर : ७२०, संभाजीनगर : १२९, जालना : १४, परभणी : २१, हिंगोली : १३, बीड : ३६, नांदेड : १००, धाराशिव : ४६, लातुर : १४६, अमरावती : १२, बुलडाणा : १२, वाशीम : ११, अकोला : २, यवतमाळ : १२, नागपूर : ३३, वर्धा : ११, भंडारा : १८, चंद्रपूर : ३, गडचिरोली : १३.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.