Baramati KVK : हायड्रोपोनिक्स संशोधनासाठी गुणवत्ता केंद्र मंजूर

Hydroponics Research : भविष्यकालीन शेतीतंत्राचा वेध घेण्यासाठी नावीन्यपूर्ण हायड्रोपोनिक्स् प्रकल्प राबविण्यास महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने मंजुरी दिली आहे.
Baramati KVK
Baramati KVK Agrowon

Pune News : भविष्यकालीन शेतीतंत्राचा वेध घेण्यासाठी नावीन्यपूर्ण हायड्रोपोनिक्स् प्रकल्प राबविण्यास महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पावर अंदाजे एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून राज्यात संरक्षित शेती तंत्रज्ञानाचे कोणते उपक्रम राबविता येतील याची चाचपणी मंडळाकडून करण्यात आली.

त्यानंतर ‘हायड्रोपॉनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपॉनिक्स, ग्रो टॉवर’ या नावाने नवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळाने अलीकडेच सेंटर ऑफ एक्सलन्सबाबत घेतलेल्या बैठकीत या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले. चर्चेत शास्त्रज्ञ यशवंत जगदाळे तसेच कृषी विभागाचे अधिकारी पल्लवी देवरे, प्रवीण गवांदे, सुरेखा जाधव, सचिन मोरे यांनी भाग घेतला.

Baramati KVK
Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेती कशी केली जाते?

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राकडून या प्रकल्पाचे कामकाज हाताळले जाईल. त्यासाठी अंमलबजावणी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. या प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे कीटकनाशक अवशेषमुक्त व चवदार भाजीपाला उत्पादन घेणे शक्य होते.

तसेच, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन सुलभ बनते. उत्पादन, उत्पादकता, मालाचा दर्जा आणि उत्पन्न या सर्व अंगाने या प्रकल्पात अभ्यास केला जाणार आहे. मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले की, हायड्रोपॉनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपॉनिक्स, ग्रो टॉवर या सर्व संकल्पना भविष्यकालीन संरक्षित शेतीसाठी दिशादायक ठरतील. त्याचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी भाजीपाला पिकांच्या विविध पद्धतींचा विकास करणे तसेच शहरी भागासाठी किचन गार्डन व टेरेस गार्डनचे प्रारूप विकसित करण्याची गरज आहे.

Baramati KVK
Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेतीत कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?

लेट्युस, पालक, तुळस, अजमोदा, पॅक चोय, वांगी, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, काकडी अशा विविध विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन कमी जागेत घेता येते, खुल्या वातावरणापेक्षाही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करीत ५०६ पटीने जास्त उत्पादन घेण्याची क्षमता असते.

त्याचा अभ्यास या प्रकल्पात केला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी संशोधन परिषदेतील शास्त्रज्ञांसह कृषी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात उच्च गुणवत्तेचा निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन करण्यासाठी नेमक्या कोणत्या शिफारशी आधुनिक शेती करणाऱ्या उत्पादकांना सांगता येतील हे निश्चित करण्याचे उद्दिष्ट हायड्रोपोनिक्स् प्रकल्पात ठेवण्यात आले आहे.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com