Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेतीत कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?

Team Agrowon

वाढते शहरीकरण

वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा परिस्थितीत पिकाचे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे आहे. यामध्ये हायड्रोपोनिक शेती म्हणजेच माती विरहित शेती हा एक पर्याय उभा राहतो आहे.

Hydroponic Farming | Agrowon

हायड्रोपोनिक शेती म्हणजे म्हणजे काय?

मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकद्रव्ये पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक असे म्हणतात.

Hydroponic Farming | Agrowon

माती विरहीत शेती

हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक म्हणजे कार्यरत म्हणजेच मातीविना शेती करणे. हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये वनस्पतीला मातीची गरज लागत नाही म्हणजेच मातीतून मिळणारे घटक जर पाण्यातून उपलब्ध करुन दिले तरी वनस्पती जगु शकते.

Hydroponic Farming | Agrowon

पीव्हीसी पाईप

हायड्रोपोनिक पद्धतीत पीव्हीसी पाईपमध्ये रोपांची लागवड केली जाते. पाईप ची लांबी- १९७ सेंमी, व्यास- १६ सेंमी आणि उतार- ४ अंश या प्रमाणात असतो.

Hydroponic Farming | Agrowon

लहान वनस्पती असलेल्या पिकांसाठी उत्तम

पाईपच्या वरील बाजूस छिद्र केले जाते आणि त्या छिद्रांमध्ये रोपे लावली जातात. पाईप पाणी वाहून नेते आणि रोपांची मुळे त्या पाण्यात बुडवलेली असतात. या पाण्यात रोपाला लागणारे सर्व पोषक घटक विरघळतात. हे तंत्र लहान वनस्पती असलेल्या पिकांसाठी उत्तम आहे. 

Hydroponic Farming | Agrowon

कोणत्या पिकासाठी उपयुक्त

जागेचा कार्यक्षम वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. जसे की गाजर, सलगम, मुळा, सिमला मिरची, वाटाणा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, टरबूज, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी, औषधी वनस्पती, पालक, काकडी, लांब दाड्याची फुले इ. रोपे चांगल्या प्रकारे वाढवता येतात.

Hydroponic Farming | Agrowon

कमीत कमी जागेत लागवड

कमीत कमी जागेमध्ये नियंत्रित पद्धतीने व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे व फळांचे चांगले उत्पादन घेता येते. 

Hydroponic Farming | Agrowon
Apple Farming | Agrowon