Agriculture Technology : रोटाव्हेटरला पर्याय पॉवर हॅरो

Rotovator : शेतीच्या अवजाराला पर्याय म्हणून पॉवर हॅरो हे अवजार वापरण्याची शिफारस केली जाते. पाहुयात त्याबद्दलची सविस्तर माहिती.
Agriculture Rotavator
Agriculture RotavatorAgrowon

Agriculture Power Harrow : मागील लेखात आपण कडक जमिनीची मशागत करण्यासाठी आदर्श अवजार असलेल्या रोटोव्हेटरबाबत माहिती घेतली. त्यामध्ये उंची समायोजित करण्यायोग्य स्कीड असून, योग्य खोलीपर्यंत घट्ट झालेली माती आपल्या उभ्या फिरणाऱ्या पात्यांमुळे तोडली जाते. कुदळीप्रमाणेच प्रत्येक ठोक्यागणिक माती उकरली जाऊन, तिचे बारीक तुकडे होतात. मात्र त्याखालील माती घट्ट होत जाते.

काही वर्षात जमिनीतील पाण्याचा निचरा कमी होतो. त्यातून मातीचा पोत बिघडण्याची शक्यता वाढते. अशा वेळी तो सुधारण्यासाठी काम करावे लागते. (उदा. सबसॉयलर वापरून निचऱ्यामध्ये सुधारणा करावी लागते.) त्यामुळे या अवजाराला पर्याय म्हणून पॉवर हॅरो हे अवजार वापरण्याची शिफारस केली जाते.

हे यंत्र चालविण्यासाठी ५५ एचपी किंवा त्या पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरची आवश्यकता असते. पॉवर हॅरो हे कमी गवत असणाऱ्या आणि खडकाळ भागांसाठी विकसित केलेले आहेत. हे मातीचा वरचा भाग चाळून घेतात. त्यानंतर फिरणाऱ्या रोलर्सद्वारे हलक्या हाताने ती माती बंद केली जाते. या पद्धतीच्या मशागतीमुळे माती लवकर उबदार होऊ शकते. पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी त्याचा फायदा होतो.

पॉवर हॅरो म्हणजे काय?

पॉवर हॅरो हे एक शक्तिशाली आणि बहुउपयोगी कृषी साधन आहे. पॉवर हॅरोमध्ये जमिनीत भुसभुशीत करण्यासोबत माती समतल करण्यासाठी उभ्या अक्षावर बसवलेल्या फिरत्या टाइन्स असतात. त्याचा वापर माती तोडून ते उत्तम भुसभुशीत करण्यासाठी केला जातो. बियाणे पेरण्यासाठी किंवा रोपांच्या पुनर्लागवडीसाठी योग्य असे गादीवाफे (सीडबेड) तयार करण्यासाठी त्यांचा वापर अधिक फायदेशीर ठरते. सीडबेड निर्मितीसाठी जगभरातील शेतकरी पॉवर हॅरोचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

पॉवर हॅरो मशिनची वैशिष्ट्ये

यातील बोरॉन स्टीलचे लांब ब्लेड

वापरलेले असून, ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीत खोल मशागत करण्यासाठी उपयोगी ठरतात.

खोली नियंत्रणासाठी आणि मातीचा वरील थर समतल करण्यासाठी खोली नियंत्रक (डेप्थ कंट्रोलर) दिलेला असतो.

मशागतीतील दोन्ही कामे एकाच वेळी करत असल्याने फेऱ्यांची संख्या कमी होते. परिणामी. ट्रॅक्टरच्या चालण्यामुळे माती घट्ट होणे कमी होते.

वेगाने काम करत असल्यामुळे कमी

वेळात काम पूर्ण होते. इंधनामध्ये बचत

होते.

दर्जेदार घटकांसह खास डिझाइन केलेले गियर बॉक्स असल्याने अवजाराला दीर्घ आयुष्य प्राप्त होते.

उच्च गुणवत्तेच्या ऑपरेटिंग सिस्टिमसह पॉवर हॅरोची किंमत ही तुलनेत स्वस्त (रु. १.३ ते १.५ लाख) आहे.

Agriculture Rotavator
Agriculture Technology : शेतीमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करा

पॉवर हॅरो वापराचे फायदे

मातीची सुधारित रचना : फिरणाऱ्या

टाइन्स घट्ट मातीचेही तुकडे करतात.

मातीमध्ये मुळांच्या कक्षेत हवा खेळती राहून वायुविजन सुधारते. वाफसा स्थिती टिकून

राहत असल्यामुळे पीक उत्पादनात वाढ

होते.

कार्यक्षम शेतजमीन निर्मिती : पॉवर हॅरोमुळे मातीची ढेकळे फोडली जाऊन, बियांचा मातीशी संपर्क सुधारतो. परिणामी, उगवण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.

कमी श्रम आणि वेळ : पॉवर हॅरो अधिक वेगाने काम करत असल्याने कमी वेळात मोठ्या क्षेत्राची मशागत करता येते. वेळ, श्रम आणि खर्च यात बचत होते.

अष्टपैलुत्व : पॉवर हॅरोचा वापर विविध मातीच्या परिस्थितीत आणि विविध प्रकारच्या पिकांसह करता येतो.

काम करतानाची सुरक्षितता

पॉवर हॅरोची वैशिष्ट्ये आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे समजून घेण्यासाठी माहिती पुस्तिका (ऑपरेटर मॅन्युअल) पूर्णपणे वाचावे.

पॉवर हॅरो ट्रॅक्टरला सुरक्षितपणे जोडलेले असल्याची खात्री करावी.

मातीची परिस्थिती आणि इच्छित परिणामांनुसार कामाची खोली समायोजित करावी.

योग्य दर्जाचे काम आणि सुरक्षितता यासाठी शिफारस केलेल्या वेगाने पॉवर हॅरो चालवावा.

Agriculture Rotavator
Agriculture Technology : रोटाव्हेटर वापरताना घ्यावयाची काळजी

पॉवर हॅरोमध्ये वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान

अचूक आणि कार्यक्षम फिल्ड कव्हरेजसाठी जीपीएस -मार्गदर्शित प्रणाली.

वेगवेगळ्या मातीच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या खोलीवर काम करण्यासाठीचे नियंत्रण (व्हेरिएबल वर्किंग डेप्थ कंट्रोल.)

सुधारित मातीच्या प्रवेशासाठी आणि मिश्रणासाठी प्रगत टाइन डिझाइन.

प्रत्यक्ष कामाच्या वेळची माहिती (रिअल-टाइम डेटा) आणि देखभाल सूचनांसाठी ‘स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टिम’.

पॉवर हॅरोसोबत वापरता येणारे उपयुक्त घटक

माती तयार केल्यानंतर कार्यक्षम पेरणीसाठी बियाणे ड्रील.

मशागत केल्यानंतर माती घट्ट आणि

समतल करण्यात मदत करण्यासाठी पॅकर रोलर्स.

कामादरम्यान सुलभ समायोजनासाठी हायड्रोलिक खोली नियंत्रण प्रणाली.

आव्हानात्मक मातीच्या परिस्थितीत कामाची खोली वाढविण्यासाठी टाइन विस्तार.

पॉवर हॅरोपासून अधिक फायदा मिळविण्यासाठी,

इष्टतम पातळीवर वापर : पॉवर हॅरोची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आपल्या कामाची कार्यक्षमतेने योजना करा.

नियमित देखभाल : पॉवर हॅरोचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आणि महागडी दुरुस्ती टाळण्यासाठी वेळच्या वेळी देखभाल करावी.

ऑपरेटर प्रशिक्षण : पॉवर हॅरोवर काम करणारी व्यक्ती प्रशिक्षित आणि अनुभवी असल्याची खात्री करा.

आवश्यकतेनुसार तंत्रज्ञान अपग्रेड करावे : दरवेळी नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानानुसार सुधारणा करून घ्याव्यात. त्यामुळे पॉवर हॅरोची कार्यक्षमता वाढते.

आपल्या गरजांसाठी योग्य पॉवर हॅरो कसा निवडावा?

कार्यरत रुंदी : कामाची रुंदी जितकी जास्त असेल, तितके जास्त क्षेत्र पॉवर हॅरो एकाच फेरीमध्ये पूर्ण करते. तुमच्या शेताचा आकार आणि तुमच्या ट्रॅक्टरच्या पॉवर क्षमतांशी (५५ ते १०० अश्‍वशक्ती) जुळणारी कार्यरत रुंदी निवडावी.

टाइन कॉन्फिगरेशन : पॉवर हॅरो वेगवेगळ्या टाइन व्यवस्थांसह येतात. उदा. सरळ किंवा वक्र टाईन्स. टाइन कॉन्फिगरेशन निवडताना तुमच्या मातीचा प्रकार आणि आपल्याला आवश्यक असलेले अपेक्षित मातीचा भुसभुशीत किंवा मऊपणा विचारात घ्यावा.

संलग्न सुसंगतता : पॉवर हॅरो हे आपल्या ट्रॅक्टरच्या जुळणी प्रणालीशी (हीच सिस्टिम) सुसंगत असल्याची खात्री करा.

ब्रँड : शक्यतो गुणवत्ता, विश्‍वासार्हता आणि विक्रीनंतर पुढेही सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा पॉवर हॅरो निवडावा.

नवीन घ्यायचा की जुना वापरलेला : नवीन पॉवर हॅरो खरेदी करताना होणारा खर्च, त्यावर मिळणारी वॉरंटी, देखभालीसह अन्य फायदे यांचाही विचार करावा. त्याची तुलना वापरलेल्या पण चांगल्या स्थितीत वापरलेल्या पॉवर हॅरो खरेदी करताना अपेक्षित असलेल्या संभाव्य खर्चाशी करून पाहावी.

विक्रेता (डीलर) : विक्रीनंतरही सर्वसमावेशक समर्थन आणि सल्ला देऊ शकतील अशा प्रतिष्ठित डीलरकडून खरेदी करावा.

चाचणी ड्राइव्ह : शक्य असल्यास, पॉवर हॅरोची चाचणी घेऊन आपल्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करत असल्याची खात्री करावी.

देखभाल : पॉवर हॅरोच्या दिर्घायुष्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी नियमित देखभाल करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी

टाइन्सची नियमित तपासणी करा. तुटलेल्या, खराब झालेल्या टाईन्स आवश्यकतेनुसार बदलाव्यात.

सर्व बोल्ट आणि फास्टनर्स नियमितपणे तपासावेत. ते योग्य दाबाने घट्ट करावेत.

निर्मात्या कंपनीच्या शिफारशीनुसार हलत्या भागामध्ये वंगण घालावे.

प्रत्येक वापरानंतर पॉवर हॅरो साफ करावा. माती चिकटून राहिल्यास गंजण्याची प्रक्रिया वेगाने होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com