Agriculture Technology : शेतीमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करा

Manisha Aavhale : शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने नावीन्यपूर्ण अशा पद्धतीने आपली शेती उत्कृष्ट करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
Manisha Aavhale
Manisha AavhaleAgrowon

Solapur News : ‘‘उमेद’च्या माध्यमातून बचत गटांतील महिलांनी शेतीकडे एक उद्योग म्हणून पहावे. शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने नावीन्यपूर्ण अशा पद्धतीने आपली शेती उत्कृष्ट करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत रंगभवन जवळ वोरोनाका प्रशालेमध्ये आयोजित अवजार बँक वितरण कार्यक्रमाप्रसंगी आव्हाळे बोलत होत्या. या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे,

Manisha Aavhale
Agriculture Technology : प्रात्यक्षिकांतून शेती तंत्रज्ञान स्वीकारा : डॉ. गोखले

जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मेस्सी फर्ग्युसन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सचिन घोलप, पवन पाटील, शुभम काळे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवली, अमोल गलांडे उपस्थित होते.

Manisha Aavhale
Agriculture Technology : रोटाव्हेटर वापरताना घ्यावयाची काळजी

आव्हाळे म्हणाल्या, ‘‘महिलांमध्ये पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे, पण त्यांनी स्वतःची ओळख फक्त गृहिणी म्हणून न ठेवता घरातील जबाबदारी पार पाडून घर व संसाराला हातभार लावण्यासाठी बचत गटांद्वारे प्रशिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. आधुनिक पद्धतीने शेती करावी व शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. पारंपरिक पद्धतीने शेती न करता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन विषमुक्त शेती करावी.’’

डॉ. ठोंबरे यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करावी, असे आवाहन केले. या वेळी तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com