Agriculture Robot : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बनविला ‘ॲगरोबो’

AI Technology In Agriculture : राजस्थानातील कोटा शहरातील एका किशोरवयीन मुलाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ॲगरोबो’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रमानव विकसित केला आहे.
Agriculture Robot
Agriculture RobotAgrowon

Agriculture Technology News : राजस्थानातील कोटा शहरातील एका किशोरवयीन मुलाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ॲगरोबो’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रमानव विकसित केला आहे. आर्यन सिंह असे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आपल्या शाळेतील अटल टिंकरिंग लॅबमध्ये या अनोख्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब हा उपक्रम राबविला जातो. शेतकऱ्याचाच मुलगा असल्याने आर्यन बालपणापासून शेतीमधील समस्या जवळून पाहत होता.

त्यातूनच त्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रमानव बनविण्याचे ठरविले. त्याने २०२० मध्ये त्याची सुरवात केली. सुमारे चार वर्षांच्या कष्टानंतर बनविलेल्या या यंत्रमानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान श्रेणीत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवून दिला.

Agriculture Robot
Agriculture Technology : तंत्रज्ञानाच्या मदतीने हमखास बागा जगविता येतील

देशभरातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील हा पुरस्कार जिंकणारी नऊ मुले व दहा मुलींमध्ये आर्यन राजस्थानातील एकमेव होता. नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारीला या सर्व मुलांसह त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

आर्यनने यंत्रमानवाचा प्रस्ताव नीती आयोगाच्या अटल नावीन्यता उपक्रम आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविला. सर्वांनी या यंत्रमानवाचे कौतुक केले.

आर्यन ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाला,‘‘शेतकरी कुटुंबातील असल्याने आई-वडील तसेच आजी-आजोबांना बालपणापासून शेतात काम करताना पाहत मोठा झालो. शेतकऱ्याचे शेतातील कष्ट कमी करण्यासाठी अनेक कामे करू शकणारे उपकरण बनविण्याची संकल्पना दहावीत सुचली.

Agriculture Robot
Agriculture Technology : अवकाशातून माहिती गोळा करण्याची उपयुक्तता

त्यातूनच प्रायोगिक तत्त्वावर ‘ॲगरोबो’ हा यंत्रमानव विकसित केला. सरकारच्या ‘आयस्टार्ट’ या स्टार्टअपसाठीच्या प्रमुख योजनेतून प्रारंभिक निधी देण्यात आला. त्यातून मला जागा, प्रयोगशाळा तसेच प्रोत्साहन मिळाले. ‘ॲगरोबो’चे वैशिष्ट्य म्हणजे तो खूप दुरूनही वापरता येऊ शकतो.

या यंत्रमानवाच्या निर्मितीबद्दल आर्यनला १५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आर्यनचे प्रशिक्षक प्रकाश सोनी म्हणाले, ‘‘कुटुंबाचा शेतातील त्रास पाहून आर्यनला हा यंत्रमानव बनविण्याची प्रेरणा मिळाली. आज त्याचे वडील इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या शेतातील कामे ॲगरोबोकडून करून घेत आहेत.’’

ॲगरोबो’ शेतातील कापणी, सिंचन, माती परीक्षण आदी अनेक कामे करू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्याचे कष्ट कमी होतील. यंत्रमानव बनविण्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला असला तरी त्याचे उत्पादन वाढल्यावर हा खर्च कमी होईल. पुढील वर्षी तो बाजारात उपलब्ध होण्याची आशा आहे.
- आर्यन सिंह, विद्यार्थी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com