Agriculture AI : कृत्रिम बुद्धिमत्तेची शेतीला साथ...

Artificial Intelligence : कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तांत्रिक उपायांद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.
Agriculture AI
Agriculture AIAgrowon

योगेश चिमटे,अमोल गाताडे

Agriculture Technology : कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तांत्रिक उपायांद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. अल्गोरिदम सेन्सर्स हे उपग्रह आणि ड्रोनमधून गोळा केलेल्या मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करतात आणि तत्काळ अचूक निर्णय घेतात.

भारतीय शेती ही प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्यावर अवलंबून आहे. देशात आजही मोठ्या संख्येने अल्प भूधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना अनेकदा कर्जाचा अभाव, मर्यादित सिंचन सुविधा, आणि अपुरा बाजार संपर्क यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. कमी कृषी उत्पादकता हे भारतीय शेतीसमोरील मोठे आव्हान आहे.

याचे निराकरण करण्यासाठी, सरकार सुधारित बियाणे, अचूक शेती तंत्र, शेती यंत्रे आणि कृषी विस्तार सेवा यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देत आहे. भारताने सिंचन विकासात लक्षणीय प्रगती केली असताना, अजूनही चांगल्या सिंचन पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम पाणी व्यवस्थापन पद्धतीची गरज आहे. हवामानातील बदलामुळे भारतीय शेतीला धोके निर्माण होत आहेत, त्यात पावसाचे अनियमित स्वरूप, उच्च तापमान आणि अनेक हवामानाच्या घटकांचा समावेश आहे.

Agriculture AI
Agriculture AI : पिकांवरील रोग, कीड ओळखण्यासाठी कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित ॲप- ‘एआय डिस्क’

भारतीय कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अभाव हे एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे जे या क्षेत्रातील उत्पादकता वाढ आणि कार्यक्षमतेत अडथळा आणत आहे. म्हणूनच एका बाजूला औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील जलद वाढ आणि कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा १५ टक्क्यांवर घसरला.

याची काही प्रमुख कारणे म्हणजे, कृषी यंत्रसामग्रीचा कमी वापर, अपुरी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानानाविषयी अपुरी जागरूकता आणि प्रशिक्षणाचा अभाव, मर्यादित संशोधन आणि विकास.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ः
१) विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा प्रभाव बहुआयामी आणि परिवर्तनकारी आहे. उत्पादनासारख्या उद्योगांमध्ये, तंत्रज्ञान हे प्रक्रिया सुलभ करते, कार्ये स्वयंचलित करते आणि उत्पादन कार्यक्षमता वाढवते.

यासाठी आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासोबत जगाच्या अन्न आणि इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक संसाधनांचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.

२) आज संगणकीय प्रणाली म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कृषी क्षेत्रात महत्त्वाचा ठरणार आहे. या तंत्राने विविध क्षेत्रात क्रांती होत आहे. जसे की आरोग्यसेवेमध्ये योजना विकसित करण्यासाठी, कर्ज देताना फसवणूक शोधण्यासाठी, परिवहन उद्योगामध्ये स्व-ड्रायव्हिंग वाहने सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी केला जात आहे.

त्याच प्रमाणे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादकता सुधारणे, अपव्यय कमी करणे आणि एकूण पीक उत्पादकता वाढविण्यासाठी प्रगत साधने आणि तंत्राचा वापर करून कृषी उद्योगात लक्षणीय क्रांती होत आहे.

३) कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध तांत्रिक उपायांद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. अल्गोरिदम सेन्सर्स हे उपग्रह आणि ड्रोनमधून गोळा केलेल्या मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करतात आणि तत्काळ व अचूक निर्णय घेतात.

ते हवामानाच्या नमुन्यांचा अंदाज लावण्यात, सिंचन वेळापत्रकाला अनुकूल करण्यात आणि खत किंवा कीटकनाशकांच्या वापरास समायोजित करण्यात मदत करतात, ज्यामुळे उपलब्ध असणाऱ्या संसाधनाचे व्यवस्थापन योग्य रीतीने करता येते.

४) कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे ड्रोन आणि रोबोट हे पेरणी, पीक आरोग्याचे निरीक्षण आणि कापणी, मजुरीचा खर्च कमी करणे आणि अचूकता वाढवणे यासारख्या कामांमध्ये मदत करतात.

५) मशिन लर्निंग, अल्गोरिदम प्रतिमा आणि नमुन्यांचे विश्लेषण करून पीक नुकसान कमी करून कीटक, रोग आणि तण ओळखण्यात आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यात मदत करतात.

६) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतीबाजारपेठेचे विश्लेषण करून, पीक उत्पादनाचा अंदाज लावणे आणि योग्य किंमत धोरण निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना माहितीपूर्ण व्यवसाय निर्णय घेण्यास मदत होते.
----------------------------------------------
संपर्क ः योगेश चिमटे, ९९६०९५६३६४
(सहाय्यक प्राध्यापक, संगणक अभियांत्रिकी, डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे. जि.कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com