Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Drone Pilot : रिमोट पायलट लायसन्सधारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.
Agriculture Drone
Agriculture DroneAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील नाहेप केंद्राद्वारे ६ महिने कालवधीचा कृषी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वर्धापनदिनी शनिवारी (ता. १८) सुरू होत आहे.

त्यासाठी पुणे येथील सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स या संस्थेसोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. रिमोट पायलट लायसन्सधारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.

Agriculture Drone
Agriculture Drone : ड्रोनची बाजारपेठ चार लाख कोटींच्या पुढे जाणार

याद्वारे ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामध्ये पीक निरीक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोनद्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणी सारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मितीसारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून, अभ्यासक्रमातील कृषिविषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. सामंजस्य करारावेळी या वेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नियंत्रक प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, या अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गुगल फॉर्मद्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा.

Agriculture Drone
Agriculture Drone Subsidy : ड्रोन अनुदान योजनेत कसा सहभाग घ्यायचा?

या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय आदी सारख्या क्षेत्रात नोकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील ४ वर्षांपासून नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात भरपूर कार्य केलेले असून, संशोधन विद्यार्थ्यांना तंतोतंत कृषी व्यावसायिकता साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

विविध १२ देशांत ५५ संशोधन विद्यार्थ्यांना तसेच २५ प्राध्यापकांना एक ते तीन महिने प्रशिक्षणासाठी पाठविले व त्यावर संशोधन प्रकाशने झाली. सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्स, पुणे ड्रोन संरचना, उत्पादन व कृषी संबंधित सेवा कार्य करीत असून, पाच वर्षांचा करार कालावधी दरम्यान कृषी ड्रोन संशोधन, चालक, चाचणी व दुरुस्तीसारख्या कार्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासोबत कार्य करणार आहे.

या करारातून दोन्ही संस्थांना निश्‍चित कार्य प्रणाली करण्यास आश्‍वासित केले. नाहेपचे प्रमुख संशोधक डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रास्ताविक व संशोधन करण्यासंबंधी करारा बाबत माहिती दिली. उपसंशोधक डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे, डी. व्ही. पाटील यांची उपस्थिती होती. या अभ्यासक्रम व करार कार्यात इंजी. श्रद्धा मुळे, संशोधन सहायक व इंजी. विशाल काळबांडे सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com