Agriculture Drone : ड्रोनची बाजारपेठ चार लाख कोटींच्या पुढे जाणार

Drone Market : कृषी व्यवस्थेत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे ड्रोनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख तयार होईल.
Agriculture Drone
Agriculture Drone Agrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी व्यवस्थेत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे ड्रोनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताची ओळख तयार होईल. तसेच, येत्या दीड दशकात ड्रोनमधील उलाढाल चार लाख कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतीय बाजारपेठेत ड्रोनची उलाढाल २०२७ मध्ये १७ हजार ७१८ कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. देशातच नव्हे तर जगभरात कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा व ड्रोनचा वापर वाढणार आहे.

आशियाई बाजारात ड्रोनची बाजारपेठ यावर्षाअखेरीस १.७ बिलिअन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचलेली असेल. परंतु, यापुढे ड्रोनविक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे २०२८ पर्यंत ड्रोन बाजारपेठ ४.७ बिलिअन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोचेल, असे मत अभ्यासकांचे आहे.

Agriculture Drone
Agriculture Drone Scheme : ड्रोन तंत्रज्ञान योजनेस कमी प्रतिसाद

ड्रोन वापरासाठी केंद्र शासनाने धोरणात्मक पालले टाकल्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार आहे. देशात पहिल्या टप्प्यात १५ हजार महिलांना ड्रोन पायलट करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांसह कृषी उद्योजक, संशोधक, खासगी पुरवठादारांना ड्रोन खरेदी करता यावी याकरिता साडेबाराशे कोटी रुपये अनुदान देण्यासदेखील केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळेच भारतीय ड्रोन बाजारपेठ वेगाने विस्तारत राहील, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात.

Agriculture Drone
Agriculture Drone Scheme : शासनाच्या ड्रोन तंत्रज्ञान योजनेला प्रतिसाद नाही

देशात दोन वर्षांत दोन लाख ड्रोन पायलट तयार करण्याबाबत यापूर्वी केंद्रीय यंत्रणांकडून चाचपणी सुरू होती. तथापि, पुरेशी प्रशिक्षण केंद्रे स्थापन न झाल्यामुळे ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या देशात केवळ ७९ ड्रोन प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. ती वाढल्यानंतरच प्रशिक्षणाला वेग येऊ शकतो.

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या अवजारे व यंत्रशक्ती विभागातील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कीड-रोग फवारणी, पीक सर्वेक्षण, शेतजमीन मोजणी व सर्वेक्षण ही कामे ड्रोन सर्वात वेगाने व बिनचूक करू शकतो हे चाचण्यांमधून सिद्ध झालेले आहे. अनुदान योजनादेखील उपलब्ध झाल्यामुळे ड्रोन वापराचा वेग या दशकात झपाट्याने वाढणार आहे.

अशी आहे ड्रोन बाजारपेठेची वैशिष्ट्ये

- नीती आयोगाच्या अंदाजानुसार येत्या १५ वर्षांत ड्रोनची उलाढाल ४.१५ लाख कोटींच्या पुढे जाणार

- भारतीय बाजारात २०१७ ते २०२१ या कालावधीत ड्रोनची उलाढाल साडेसात टक्क्यांनी वाढत गेली.

- कृषी वापरामुळे ड्रोनची एकूण उलाढाल २०२२ ते २०२७ या कालावधीत दुपटीने म्हणणेच १५.७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज.

देशाच्या कृषी अवजारे बाजारपेठांमध्ये ड्रोन लवकरच स्वतःची जागा तयार करतील. प्रयोगशील शेतीत राज्य आघाडीवर असल्याने ड्रोन वापरातही महाराष्ट्र आघाडीवर राहील.

-डॉ. सचिन नलावडे, मुख्य व्यवस्थापक, ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com