Team Agrowon
शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत. नुकतेच पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
संबंधित कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून योजनेबद्दलची अधिक माहिती मिळवू शकता.
ड्रोन खरेदीवर अनुदान मिळवायचे असेल तर अगोदर त्यासंबंधीची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे.
शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना शासनामार्फत ड्रोनफवारणी करतेवेळी कशा प्रकारे हाताळावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो.पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते.
विद्यापीठे व सरकारी संस्था- १०० टक्के अनुदान (१० लाखांपर्यंत)
शेतकरी उत्पादक संस्था- ७५ टक्के अनुदान (७ लाख ५०,००० रुपये)
कृषी पदवीधारकासाठी- ५ लाखांपर्यंत अनुदान
इतर शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख अनुदान.