Poultry Feed : कोंबड्यांना बुरशीयुक्त खाद्य देताय?

कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण आहे. या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते.
 Poultry Feed
Poultry Feed Agrowon

कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे विषबाधा हे एक कारण आहे. या आजारांमध्ये इतर आजारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात मरतूक आढळून येते. खाद्यातील अचानक बदल व ओलावा बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरतो. कुक्कुटपालनात खाद्यावर ७५ ते ८० टक्के खर्च होतो. पावसाळा व हिवाळा ऋतूमध्ये खाद्यामध्ये बुरशी तयार झाल्यामुळे कोंबड्यांमध्ये विषबाधा आढळून येते. खाद्य आणि त्यातील घटक बुरशीच्या वाढीस आणि त्यांचे विष तयार करण्यास अनुकूल असतात.

 Poultry Feed
पावसाळ्यात शेळ्यांना होते ‘या’ गवताची विषबाधा

अफ्लाटॉक्झिन व ऑकराटॉक्झिन अशा दोन प्रकारच्या बुरशी खाद्यामध्ये तयार होऊन कोंबड्यांमध्ये विषबाधा होते.

बुरशीजन्य खाद्यामुळे कोंबड्यांवर काय परिणाम होतात?

वाढ व अंडी उत्पादनात घट, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन कोंबड्या अनेक संसर्गजन्य आजारांना बळी पडतात.  अंड्यांची उबवणक्षमता कमी होणे, अशक्तपणा, पांगळेपणा, पाणी व आहार ग्रहणात घट दिसून येते. कोंबड्यांमध्ये हगवण, पंख खडबडीत होणे व जास्त प्रमाणात मरतुकीचे प्रमाण इत्यादी लक्षणे आढळून येतात. कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्यास अफ्लाटॉक्झिकोसिसमध्ये यकृताला सूज, पिवळेपणा व नरमपणा येतो. तसेच, ऑकराटॉक्झिकोसिसमध्ये मूत्रपिंड लाल व मोठे होते आणि मूत्रनलिकेत पांढऱ्या रंगाचे युरिक ॲसिड जास्त प्रमाणात जमा झाल्याचे आढळून येते.

 Poultry Feed
Crop Protection : जास्त थंडी फळपिकांसाठी का आहे हानीकारक? | ॲग्रोवन

उपाययोजना काय आहेत?

विषबाधेवर प्रत्यक्ष गुणकारी औषध नाही. विषबाधा झालेल्या कोंबड्यांना पूरक औषध म्हणून लिव्हर टॉनिक व जीवनसत्त्वे पाण्यात मिसळून द्यावीत.

हळद पावडर ५० ग्रॅम प्रति १०० किलो खाद्यामध्ये किंवा १ ग्रॅम प्रति २ लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये ४ दिवस दिल्यास बुरशीमुळे कोंबड्यांमधील मरतूक कमी करता येते.

विषबाधेवर प्रतिबंधक उपाय म्हणून कुक्कुट खाद्यामध्ये ओलावा किंवा बुरशीची वाढ झाली नाही ना, याची खात्री करावी. खराब व ओलसर झालेले धान्य खाद्यात वापरू नये.

खाद्यांची साठवण जमिनीच्या वर एक ते दीड फूट उंचावर करावी.

खाद्य हे जीवाणू, विषाणू, बुरशी, विषारी घटक आणि निरुपयोगी घटकांपासून मुक्त असावे.

खाद्य जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नये, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ देऊ नये.

खाद्य कोरड्या जागेवर व सभोवताली हवा खेळती राहील अशा ठिकाणी साठवून ठेवावे.

खाद्यगृहामध्ये उंदीर, घुशी, पक्षी, कुत्रे जाणार नाही याची काळजी घ्यावी.

कोंबड्यांना मॅश फीडएवजी गोळी तुकडा खाद्य देणे फायदेशीर ठरते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी खाद्यामध्ये बदल करून कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन करावे.

कोंबड्यांना खाद्य देताना ते सांडणार नाही याची काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com