रेशनकार्ड धारकांना मिळणार फोर्टिफाईड तांदूळ

फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे मानवी शरीराला आवश्यक पोषक घटकांचा समावेश असणारा तांदूळ अथवा विविध पोषक घटकांचा अंतर्भाव करून विकसित केलेला तांदूळ. देशातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी रेशन दुकानांसह सर्वच ठिकाणी फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे.
 Centre targets to distribute fortified rice to all ration card holders in 2 years
Centre targets to distribute fortified rice to all ration card holders in 2 yearsAgrowon
Published on
Updated on

देशातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे फोर्टिफाईड तांदूळ वाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या २ वर्षांत देशातील सर्व रेशन कार्डधारकांना फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध होणार आहे. या निर्णयावर केंद्रीय कॅबिनेटच्या वित्तीय व्यवहार समितीने (CCEA) शिक्कामोर्तब केले आहे.

फोर्टिफाईड तांदूळ म्हणजे मानवी शरीराला आवश्यक पोषक घटकांचा समावेश असणारा तांदूळ अथवा विविध पोषक घटकांचा अंतर्भाव करून विकसित केलेला तांदूळ. देशातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी रेशन दुकानांसह सर्वच ठिकाणी फोर्टिफाईड तांदूळ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे.

 Centre targets to distribute fortified rice to all ration card holders in 2 years
जुलैपर्यंत ३५ लाख टन गहू निर्यातीचे करार

सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS)आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून फोर्टिफाईड तांदूळ वाटपाला कॅबिनेटने तीन टप्प्यात संमती दिली असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतीच दिली आहे. त्यासाठी केंद्र सरकारला वर्षाकाठी सुमारे २७०० कोटी रुपये खर्च येणार आहे. खाद्य सुरक्षा अभियानाचा भाग म्हणून हा खर्च केंद्र सरकारकडून केला जाणार आहे.

प्रारंभी सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि केंद्र सरकारी योजनांच्या माध्यमातून फोर्टिफाईड तांदूळ वाटप केला जाईल अन नंतरच्या टप्प्यात फोर्टिफाईड तांदूळ सर्वच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

 Centre targets to distribute fortified rice to all ration card holders in 2 years
इजिप्तकडून भारतीय गव्हाच्या खरेदीची शक्यता; शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्या अंतर्गत (NFSA) ८१ कोटी लाभार्थी वगळून एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या इतर कल्याणकारी योजनांच्या (OWS) माध्यमातून फोर्टिफाईड तांदूळ वाटल्या जाणार आहे.

२०१९ पासून तीन वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) आणि माध्यान्ह भोजन योजना (PM POSHAN) या दोन योजनेच्या माध्यमातून फोर्टिफाइड तांदूळ वाटप करण्यात येत आहे. याशिवाय उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी एका जिल्ह्यांत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येत आहे.

पुढच्या टप्प्यात मार्च २०२३ अखेरीस देशातील ॲस्पायरेशनल आणि उपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या २९१ जिल्ह्यांत सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून फोर्टिफाईड तांदूळ पुरवण्यात येणार आहे. त्यापुढच्या टप्प्यात मार्च २०२४ अखेरीस इतर सर्व जिल्ह्यांत फोर्टिफाईड तांदूळ वाटण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com