इजिप्तकडून भारतीय गव्हाच्या खरेदीची शक्यता; शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

रशिया युक्रेन संघर्षाचे पडसाद म्हणून बरेच देश भारताकडून गहू खरेदी करत आहेत. इजिप्तनेही भारताकडे गहू खरेदीसाठी विचारणा केली आहे.
Egyptian Govt expresses interest to buy Indian wheat
Egyptian Govt expresses interest to buy Indian wheatAgrowon
Published on
Updated on

इजिप्तच्या जनरल ॲथॉरिटी ऑफ सप्लाय अँड कमोडिटीजने (GASC) भारताकडून गहू आणि साखर खरेदी करण्यात रस दाखवला असून त्यासाठी इजिप्तचे एक शिष्टमंडळही १० एप्रिल रोजी भारतात दाखल होणार आहे.

रशिया युक्रेन संघर्षाचे पडसाद म्हणून बरेच देश भारताकडून गहू (Wheat) खरेदी करत आहेत. इजिप्तनेही भारताकडे गहू खरेदीसाठी विचारणा केली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून ज्या भारतीय निर्यातदारांना इजिप्तला गहू पुरवण्यात रस आहे त्यांनी स्थानिक यंत्रणेकडे नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कैरो येथील भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

निर्यातीसाठी उत्सुक भारतीय निर्यातदार संस्थांना आवश्यक प्रक्रिया पार पाडून जनरल ॲथॉरिटी ऑफ सप्लाय अँड कमोडिटीजकडे (GASC) पूर्वनोंदणी करावी लागेल, अशी माहिती अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी दिली आहे.

Egyptian Govt expresses interest to buy Indian wheat
युरोपियन देशाकडून भारतीय कोकोनट तेलाला मागणी

येत्या १० एप्रिल रोजी इजिप्तचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे. हे शिष्टमंडळ भारतातील गहू (Wheat) उत्पादन पद्धती,त्याची गुणवत्ता ठरवण्याची प्रक्रिया या गोष्टी समजावून घेणार आहे. तसेच पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरात या गहू उत्पादक राज्यांनाही भेट देणार असल्याची माहिती अंगमुथू यांनी दिली आहे.

इजिप्तने त्यांच्या धान्य आयात धोरणात बदल केला आहे. त्यानुसार त्यांच्या आयाती विषयक नियमावलीतही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी इजिप्तमधील धान्य आयातीची जबाबदारी जनरल ऑर्गनायजेशन फॉर एक्स्पोर्ट अँड इम्पोर्ट कंट्रोल या संस्थेकडे होती. आता नव्या धोरणानुसार ही जबाबदारी नॅशनल फूड सेफ्टी ॲथॉरिटीवर (NFSA) सोपवण्यात आली आहे.

ही यंत्रणा आयात धान्याची काटेकोर तपासणी करून, गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण झाल्यावरच तो देशात उतरून घेते. भारतीय गव्हासाठी इजिप्तकडून हे निकष काहीसे शिथिल केले जाऊ शकतात. कारण आजवर इजिप्त रशिया आणि युक्रेनमधून गहू खरेदी करत होता. आता त्याला भारतीय गव्हाखेरीज अन्य पर्याय उरला नसल्याने इजिप्तच्या यंत्रणा भारतीय गहू आयातीच्यावेळी गुणवत्तेच्या मुद्यावरून फारशी खळखळ करणार नाहीत, असा विश्वास दिल्ली येथील गहू निर्यातदार राजेश पहारिया -जैन यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक बाजारातील गव्हाच्या तुलनेत भारतीय गव्हाचे दर कमी आहेत. वाहतूक खर्च वगळता भारताचा गहू ३५० डॉलर्स प्रति टन दराने उपलब्ध होऊ शकतो. त्यातुलनेत अमेरिका आणि युरोपचा गहू प्रति टन ४१० डॉलर्सला पडतो. अर्जेंटिनाचा गहू प्रति टन ३९६ डॉलर्सला पडतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com