POCRA Subsidy : ‘पोकरा’तून तीन लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अनुदान

Agriculture Scheme : ‘पोकरा’साठी मराठवाड्यातील २६२७ गावे निवडली गेली. या गावांमधून जवळपास ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांनी प्रकल्पांतर्गत नोंदणी केली.
POCRA Project
POCRA ProjectAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : शेतकरी, गाव, वाड्या, वस्त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय्य घेऊन मराठवाड्यातील अडीच हजारावर गावात राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोक्रा’ प्रकल्पातून एप्रिल अखेरपर्यंत ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना १९६३ कोटी ८३ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. प्रकल्पात सहभागी गावातील जवळपास ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.

‘पोकरा’साठी मराठवाड्यातील २६२७ गावे निवडली गेली. या गावांमधून जवळपास ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांनी प्रकल्पांतर्गत नोंदणी केली. या शेतकऱ्यांकडून जवळपास १६ लाख १३ हजार ५३२ अर्ज प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी प्राप्त झाले.

POCRA Project
POCRA Scheme : ‘पोकरा’ची बैठक ऐनवेळी मुंबईत घेण्याचा निर्णय

त्यापैकी ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अवजारे बॅंक, फळबाग व इतर विविध योजनांसाठी जवळपास १९६३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ही माहिती कृषी विभागाच्या मराठवाडास्तरीय आढावा बैठकीतून कळाली.

POCRA Project
POCRA Project : वाशीमला ‘पोकरा’ प्रकल्पातून गटांना १५.७७ कोटींचे अनुदान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा या योजनेच्या लाभात आघाडीवर आहे. या जिल्ह्यातील सर्वाधिक गावेही या प्रकल्पात समाविष्ट आहेत. या जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

मृद व जलसंधारणाची १७०५ कामे पूर्ण

पोक्रा प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असलेल्या मराठवाड्यातील २६२७ गावांमध्ये एप्रिल अखेरपर्यंत मृद व जलसंधारणाची २३५२ कामे सुरू आहेत. तर १७०५ कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांवर १६ कोटी ७९ लाख ७२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक कामे झाली आहेत.

मराठवाड्यातील ‘एफपीओ’, ‘एफपीसी’, ‘एसएचजी’चे जवळपास ५६८८ प्रस्ताव दाखल झाले. ८२० कोटी ९४ लाख २५ हजाराचे प्रकल्प मूल्य असलेले प्रस्ताव सादर केले गेले. त्यापैकी २६०१ प्रकल्प प्रस्तावांनाच १९३ कोटी २२ लाख ८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले.

पोक्रा योजना संजीवनीच म्हणता येईल. काही प्रकल्प प्रस्तावांचे अनुदान प्रक्रियेत असेल. ते प्रत्यक्ष त्या लाभार्थी घटकाच्या पदरात पडले आणि त्या घटकाने प्राप्त योजनेतून आपल्या शेतीचा विकास केला तर पोक्रा योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल.
- डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com