POCRA Scheme : ‘पोकरा’ची बैठक ऐनवेळी मुंबईत घेण्याचा निर्णय

Fruit Research Center : छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या समिती सभागृहात आज (ता. ११) होणाऱ्या दोन बैठका ऐनवेळी मुंबईत घेण्याचा निर्णय कळविण्यात आला आहे.
POCRA
POCRAAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या समिती सभागृहात आज (ता. ११) होणाऱ्या दोन बैठका ऐनवेळी मुंबईत घेण्याचा निर्णय कळविण्यात आला आहे. त्यामुळे बैठकीशी संबंधित यंत्रणेवर इकडची तयारी सोडून मुंबईकडे रवाना होण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा प्रकल्पाची राज्यस्तरीय बैठक छत्रपती संभाजीनगरमधील हिमायत बाग फळसंशोधन केंद्राच्या समिती सभागृहात आज (ता.११) होणार होती.

अनुक्रमे दुपारी १२ वाजता व २.३० वाजता या बैठका होणार होत्या. त्यासाठी पूर्वतयारी झाली होती. पोकरा आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे अधिकारी, तज्ज्ञ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले होते.

POCRA
Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament : क्रीडा संकुल प्रस्तावास मान्यता देऊ : फडणवीस

परंतु बुधवारी (ता.१०) दुपारी अचानक या बैठकांचे स्थळ मुंबईमधील मंत्रालयात निश्चित करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांच्या खासगी सचिवामार्फत कळविण्यात आले. त्यामुळे ‘राजा बोले आणि प्रजा हाले’ या उक्तीचा परिचय देत अधिकारी, तज्ज्ञांनी अचानक मुंबईचा मार्ग धरला.

कृषिमंत्री मराठवाड्याचे असूनही असे का ?

तसे पाहता अशा बैठका नेहमी मुंबईतच व्हायच्या. आता ही बैठक मराठवाड्याच्या राजधानीत होणार होती. ती ऐनवेळी रद्द झाल्याने कृषिमंत्री मराठवाड्याचे असूनही असे का घडले. कृषी खात्यात नेमके सुरू आहे तरी काय? अशी चर्चा संबंधितांमध्ये सुरू झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com