POCRA Project : वाशीमला ‘पोकरा’ प्रकल्पातून गटांना १५.७७ कोटींचे अनुदान

गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांना पाठबळ देण्यात येत आहे.
POCRA Project
POCRA ProjectAgrowon
Published on
Updated on

Washim News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) माध्यमातून निवड केलेल्या जिल्ह्यातील १४९ गावांतील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या दृष्टीने गाव पातळीवर असलेल्या कृषी संजीवनी समितीच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

संबंधित गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांना पाठबळ देण्यात येत आहे.

पोकरा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या गावातील १६४ शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांना कृषिविषयक बाबीसाठी १५ कोटी ७७ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

POCRA Project
POCRA Scheme : कुठे ट्रॅक्टर कामाला, कुठे दर आकारणी फलक गायब

पोकराच्या या गावातील शेतकऱ्यांना शेती यांत्रिकी पद्धतीने करता यावी तसेच शेतीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी ११६ शेतकरी गटांना अवजारे बँक तयार करण्यासाठी कृषी यंत्रे खरेदीसाठी १० कोटी ९७ लाख रुपये, ६ शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांचा उत्पादित माल ठेवण्यासाठी गोदामाचे बांधकाम करण्यासाठी ८३ लाख ७८ हजार रुपये, शेतातील उत्पादित केलेल्या धान्याची स्वच्छता व प्रतवारीसाठी लागणारे सेपरेटर खरेदी करण्यासाठी ४ शेतकरी गटांना ३२ लाख रुपये, दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांना ऑइल युनिट सुरू करण्यासाठी २३ लाख ९३ हजार रुपये, २६ शेतकरी गटांना धान्य सुकवणी केंद्र तयार करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, ८ शेतकरी गटांना शेळी पैदास केंद्रासाठी ७६ लाख ३९ हजार रुपये आणि दोन शेतकरी गटांना हळद प्रक्रिया व गांडूळ खतनिर्मितीसाठी १४ लाख ६३ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे.

ज्या शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांना या प्रकल्पांतर्गत विविध कृषिविषयक बाबींसाठी अनुदान देण्यात आले आहे. त्या कंपन्या व गटांशी जुळलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com