Chana Seed : गहू, हरभऱ्याचे अनुदानित बियाणे

केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

नगर : रब्बी हंगामात महाबीज (Mahabeej) कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर (Seed On Subsidy) उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदान बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महादित्य जिल्हा व्यवस्थापक रवींद्र जोशी यांनी केले आहे.

केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे.

Chana Market
Oil Seed Subsidy : ‘गळीतधान्य, तेलबिया’ योजनेचे अनुदान रखडले

हरभरा व गहू बियाणे महाबीज विक्रेत्यांकडे उपलब्ध राहणार आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

Chana Market
Mahabeej Seed : ‘महाबीज’चे हरभरा, गव्हाचे बियाणे अनुदानित दराने उपलब्ध

हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध

१० वर्षांआतील हरभरा वाणासाठी (फुले विक्रम, फुले विक्रांत, राजविजय -२०२ व इतर) प्रति क्विंटल अनुदान २ हजार ५०० रुपये राहणार असून, अनुदानित विक्री दर ४ हजार ५०० रुपये आहे.

१० वर्षांवरील हरभरा वाणासाठी (विजय, दिग्विजय, विशाल व

इतर) प्रति ‍क्विंटल अनुदान -२

हजार रुपये राहणार असून,

अनुदानित विक्री दर ५ हजार राहणार आहे.

१० वर्षांआतील हरभरा काबुली वाणासाठी (BDNGK -७९८) अनुदान- २ हजार ५०० राहणार असून अनुदानित विक्री दर ८ हजार ५०० रुपये आहे.

१० वर्षांवरील हरभरा काबुली वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान २ हजार राहणार असून, अनुदानित विक्री दर ९ हजार रुपये आहे.

गहू बियाण्यांवर मिळणार ‘इतके’ अनुदान...

१० वर्षांआतील गव्हाचा वाणासाठी प्रति क्विंटल अनुदान १ हजार ५०० असून अनुदानित विकी दर २ हजार ५०० रुपये १० वर्षांवरील गव्हाचा प्रति क्विंटल अनुदान १ हजार ५०० असून अनुदानित विक्री दर २ हजार ७०० रुपये आहेत.

‘परमिट’ घ्यावे लागणार

जिल्ह्यात ‘महाबीज’च्या सर्वच विक्रेत्यांकडे गहू व हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे सातबारा व आधार कार्डची छायाप्रत (झेरॉक्स) जमा करून ‘परमिट’ घ्यावे व स्थानिक महाबीज विक्रेत्याकडून अनुदानावर बियाणे प्राप्त करून घ्यावे. एका शेतकऱ्यास एक एकरचा लाभ देण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. जोशी यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com