Fisheries : ‘आधार क्यूआर’साठी १४ हजार ५७ मच्छीमारांची नोंदणी

समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना क्युआर कोड पीव्हीसी आधारकार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
Fisheries
FisheriesAgrowon
Published on
Updated on

रत्नागिरी ः समुद्रात मासेमारीसाठी (Sea Fishing) जाणाऱ्या मच्छीमारांना क्युआर कोड (QR Code For Fisherman) पीव्हीसी आधारकार्ड (PVC Aadhar Card For Fisherman) अत्यावश्यक करण्यात आले आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. खलाशी, मच्छीमारांचे आधारकार्ड क्युआर कोड तयार करण्यासाठी मत्स्य विभागाकडून (Department Of Fisheries) नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत १४ हजार ५७ मच्छीमारांची नोंद झाली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Fisheries
Sea Fishing : समुद्री मासेमारीला ब्रेक

दहशतवादी कारवायांसाठी कोकणातील समुद्र किनाऱ्याचा वापर झाल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व प्राप्त झाले असून केंद्र शासनाकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. अनेकवेळा दहशतवादी मच्छीमारी नौकांचा वापर करून भारताच्या हद्दीत प्रवेश करतात. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावर हजारो मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात ये-जा करतात. यामध्ये अनेक मच्छीमारांकडे साधी ओळखपत्रेही नसतात. त्याचा गैरफायदा घेऊन दहशतवादी शिरकाव करण्याची भीती वारंवार व्यक्त केली जाते.

Fisheries
Fish Farming : मच्छीमारांच्या जाळ्यात तारली सापडेना

काही दिवसांपूर्वी परदेशातील एक नौका भरकटत अलिबागच्या किनारी आली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणाही तेवढीच दक्ष झाली होती. गेल्या काही वर्षांत असे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशातील मच्छीमारी नौकांची नोंदणी, नौकांवरील खलाशांच्या नोंदणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. युनिक आयडेंटिटी म्हणून आधार कार्डकडे पाहिले जाते. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. त्याला जोड म्हणून क्युआर कोड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. क्युआर कोडेड पीव्हीसी आधारकार्डवरून संबंधित व्यक्तीची माहिती पुढे येते.

तो महाराष्ट्र राज्यातील सातही समुद्र किनारी जिल्ह्यातील मच्छीमारांना क्युआर कोडेड आधारकार्ड अत्यावश्यक केले आहे. जे समुद्रात जाणारे मच्छीमार, खलाशी आहेत त्यांना ते जवळ बाळगणे गरजेचे आहे. ते नसेल तर संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देशही आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा सहायक मत्स्य विभागाकडून आधारला क्युआर कोड लिंक करण्याची मोहीम घेण्यात आली होती. जिल्ह्यात समुद्रात जाणारे साडेपंधरा हजार मच्छीमार आहेत.

समुद्रात जाणारे खलाशी, मच्छीमार यांच्या क्युआर कोडेड पीव्हीसी आधार कार्डचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार ही कार्यवाही सुरू आहे. हे कार्ड नसलेला एकही मच्छीमार आढळणार नाही.
एन. व्ही. भादुले, सहायक मत्स्य आयुक्त.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com