Sea Fishing : समुद्री मासेमारीला ब्रेक

वादळसदृश स्थिती; मासळीच्या दरात वाढ
Sea Fishing
Sea FishingAgrowon

समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश स्थितीमुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. (Sea fishing) त्यामुळे मासळी टंचाई निर्माण झाली असून, मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या वर्षीच्या मासेमारी हंगामाला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली असली तरी खऱ्या अर्थाने पांरपरिक मच्छीमार (Traditional fishermen) नारळी पौर्णिमेनतंरच मासेमारीला प्रारंभ करतात. या वर्षी मासेमारी हंगामाचा प्रारंभ चांगला झाला होता.

मच्छीमारांना चांगली मासळी मिळाली होती. प्राप्त मासळीला चांगला दर देखील मिळाला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच समुद्रात देखील वादळसदृश स्थिती निर्माण झालेली असून, मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता वादळस्थिती अधिकच गडद झाली आहे.

त्याचा मोठा परिणाम मासेमारीवर झाला आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर होत असलेली रापण, गिलनेट पद्धतीची मासेमारी पूर्ण ठप्प झाली आहे. मासळीची आवक कमी झाल्यामुळे मासळीच्या दरात मात्र चांगलीच वाढ झाली आहे. बाजारपेठेत येत असलेली मासळी हॉटेल व्यावसायिक खरेदी करीत असल्यामुळे ग्राहकांना मासळी मिळेनाशी झाली आहे. समुद्रातील स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

Sea Fishing
Fish Farming : मच्छीमारांच्या जाळ्यात तारली सापडेना

समुद्रात वादळसदृश स्थिती आणि सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. तीन, चार दिवसांत वातावरण निवळेल अशी अपेक्षा आहे.

- मिथुन मालंडकर, मच्छीमार, मालवण *मासळीचे प्रतिकिलोचे दर बांगडा-३००, सुरमई-८००, कोळंबी-५००, पापलेट-८००, मोरी-३५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com