Solar Kusum Scheme : महाऊर्जा संकेतस्थळ चालेना

Maha Urja Portal : पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी धावपळ करीत असले तरी महाऊर्जा संकेतस्थळाला आलेल्या मरगळीमुळे ही योजना डोकेदुखी ठरत आहे.
 kusum Scheme
kusum Scheme Agrowon

Jalna News : पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत कृषिपंप घेण्यासाठी शेतकरी धावपळ करीत असले तरी महाऊर्जा संकेतस्थळाला आलेल्या मरगळीमुळे ही योजना डोकेदुखी ठरत आहे.

अर्ज करताना आधार नंबर, भ्रमणध्वनी, गाव, जिल्हा, जात प्रवर्ग आदी माहिती भरून शंभर रुपये कपात होऊनही पुढील पेज उघडत नाही.

कपात झालेले पैसेही मिळत नसल्याने शेतकरी, सीएससी केंद्र चालक कंटाळले असून यावर शासनाने उपाय काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

कृषिपंपांना सौर ऊर्जेचे बळ देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होते आहे. दरवर्षी एक लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट असून १७ मे पासून संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

 kusum Scheme
Solar Energy Project : मोहोळ तालुक्यात दोनशे एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प

विकास अभिकरणाच्या महाऊर्जा या संकेतस्थळाला अडचणी निर्माण होत. अनेकवेळा संकेतस्थळ चालत नाही. त्याचबरोबर ऑनलाइन काम करणाऱ्या सीएससी केंद्र चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कारण कपात झालेले पैसे परत मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान कुसूम सौर कृषिपंप योजना डोकेदुखी ठरत आहे.संकेतस्थळ व्यवस्थित चालत देखील नाही खूप वेळ बंद राहत आहेत.

 kusum Scheme
Solar Agriculture Scheme : सौर कृषी वाहिनी योजनेतून मिळणार एकरी ५० हजार रुपये
संकेतस्थळ सुरू झाल्याची माहिती मिळाल्यापासून अर्ज नोंदणी सुरू केलेली आहे. परंतु संकेतस्थळावरून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. पैसे कपात होऊनही पुढील प्रोसेस होत नाही. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने संकेतस्थळाला सोसत नसल्याची परिस्थती आहे.
- सौरभ दासमले, सीएससी केंद्र चालक
शेतात सध्या खरीप हंगामपूर्व कामे सुरू आहेत परंतु सौर कृषीपंप मिळविण्यासाठी महाऊर्जा संकेतस्थळावरून मागील चार ते पाच दिवसांपासून नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तीन ते चार वेळेस पैसे कपात होऊनही नोंदणी होत नाही. कपात झालेले पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा करावेत.
- सुरेश काळे, शेतकरी, परतूर
शेतीसाठी नियमित वीज मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे. यात सौर कुसूम योजना संकेतस्थळ चालत नसल्याने अर्ज भरता येत नाही, शासनाने उपयोजना करून ऑफलाइन अर्ज स्वीकारावेत. -
गणेश राजबिंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष, परतूर

कृषिपंपासाठी मिळणारे अनुदान

सर्वसाधारण प्रवर्ग शेतकरी नव्वद टक्के

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : ९५ टक्के

शेतजमिनीनुसार पंपाची क्षमता

अडीच एकर पर्यंत - ३ अश्वशक्ती,

पाच एकर पर्यंत ५ अश्वशक्ती,

यापेक्षा अधिक जमीन - ७.५ अश्वशक्ती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com