Solar Energy Project : मोहोळ तालुक्यात दोनशे एकरांवर सौरऊर्जा प्रकल्प

Irrigation Project : मोहोळ तालुक्यात सध्या २१ ऊर्जा विद्युत उपकेंद्र आहेत. सीना, भीमा नद्या, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे.
Solar Energy Project
Solar Energy ProjectAgrowon
Published on
Updated on

Solar Project Solapur News : वरचेवर वाढणारे बागायती क्षेत्र, त्यासाठी वाढती विजेची मागणी व शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण यामुळे आता महावितरणने ‘‘सौरऊर्जा प्रकल्पावर’’ भर दिला असून, मोहोळ तालुक्यात दोनशे एकरांवर हा प्रकल्प राबविणार असल्याची माहिती मोहोळ येथील महावितरणचे सहायक अभियंता शीतल वनारसे यांनी दिले.

मोहोळ तालुक्यात सध्या २१ ऊर्जा विद्युत उपकेंद्र आहेत. सीना, भीमा नद्या, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात विविध फळबागा व ऊस या पिकांचा समावेश आहे. परिणामी, विजेची मागणी वरचेवर वाढतच आहे.

सर्वांत जास्त अडचण उन्हाळ्यात येते. घरगुती उपकरणे व शेती पंप सुरू असल्याने वीज कमी पडते, त्यामुळे तक्रारीचे प्रमाण वाढते. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढते.

Solar Energy Project
Solar Agriculture Pump : कोल्हापुरात ‘सौर कृषी वाहिनी’बाबत जनजागृती

त्यासाठी ऊर्जा विभागाने आता सौरऊर्जेचा मार्ग अवलंबला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. सौरऊर्जा थेट शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, ती ट्रान्स्फॉर्मरमध्ये साठविली जाणार नाही. त्यामुळे विजेचे दरही कमी होणार आहेत.

या सौरऊर्जा प्रकल्पासाठी विद्युत उपकेंद्राजवळ दहा किलोमीटर परिसरात जागा उपलब्ध असावी, सध्या या प्रकल्पाचे काम मोहोळ तालुक्यात वेगाने सुरू आहे. संबंधित ग्रामपंचायतीनी ठराव करून दिले व त्यांच्या जागेत सौरऊर्जा प्रकल्प साकारला, तर त्यांच्या वार्षिक महसुलात घसघशीत वाढ होणार आहे.

तसेच खासगी शेतकरी ही या प्रकल्पासाठी जागा देऊ शकतात. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रमाण कमी होणार आहे. दिवसा व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. सध्याची जी विद्युत उपकेंद्रे आहेत. त्यांना पायाभूत सुविधा अंतर्गत निधीही उपलब्ध होणार असल्याचेही वनारसे यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींनी ठराव द्यावेत

सध्या मोहोळ शहर, पापरी, दादपूर, सय्यद वरवडे, कोळेगाव, शिरापूर (सो), बैरागवाडी या गावांत जागांची निश्‍चिती झाली असून, यातील काही ग्रामपंचायतींचे ठराव ही आले आहेत. २२ ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या ग्रामसभेत जास्तीत-जास्त ग्रामपंचायतीनी या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ठराव करून द्यावेत, असे आवाहन अभियंता वनारसे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com