Solar Agriculture Scheme : सौर कृषी वाहिनी योजनेतून मिळणार एकरी ५० हजार रुपये

Solar Energy : महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यातून अहमदनगर जिल्ह्यातील कृषी फीडर सौरऊर्जीत करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ही योजना यशस्वी करावी.
Solar Energy
Solar EnergyAgrowon
Published on
Updated on

Nagar Solar News : महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. यातून अहमदनगर जिल्ह्यातील कृषी फीडर सौरऊर्जीत करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ही योजना यशस्वी करावी.

यासाठी सर्वांच्या पुढाकाराची अन्‌ सहकार्याची गरज आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार असून, महावितरण मार्फत प्रतिएकर, प्रतिवर्ष ५० हजार रुपये भाडे दिले जाईल, अशी माहिती ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी दिली.

सौर कृषी वाहिनी योजनेला गतिमान करण्यासाठी शुक्ला यांनी सोमवारी (ता. २९) नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण, महसूल, वनविभाग, भूमिअभिलेख व संबंधित विभागांची एकत्रित आढावा बैठक घेतली.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, की शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शासनाने ‘डिसेंबर २०२५’ डेडलाईन ठेवली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या सौर प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याकरिता सर्व विभागाने विहित काल मर्यादेत काम करणे आवश्यक आहे.

Solar Energy
Solar Project : सौर प्रकल्पासाठी अपेक्षेच्या केवळ दहा टक्केच जमीन

सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ योजनेत सहभागी होण्याचा विहित कालावधीत ठराव घ्यावा. ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतील, त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष ५ लाखांप्रमाणे तीन वर्षांत १५ लाखाचा निधी दिला जाणार आहे.

तर ज्या गावात सरकारी जमिनी उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमिनीला महावितरणमार्फत प्रति एकर, प्रति वर्ष ५० हजार रुपये भाडे दिले जाणार असून, त्यामध्ये दर वर्षी ३ टक्के वाढ केली जाईल. याकरिता महावितरणने लँड बँक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नोंदणी शुल्क भरून जमीन भाड्याने देऊ शकतात.

१० हजार ७३६ एकर जमिनीची गरज

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ योजना गतिमान करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात २०९ विद्युत उपकेंद्रे योजनेतून सौरऊर्जीकरण होणार असून, २ हजार १४७ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. यासाठी १० हजार ७३६ एकर जमिनीची गरज भासणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज मिळणार असून, यासाठी जिल्ह्यातील समाजातील सर्वच घटकांनी जमिनी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com