POCRA : जागतिक बँकेच्या लेखापरीक्षकांची पोकरा प्रकल्पांतर्गत कामाची पाहणी

जागतिक बँकेचे लेखा परीक्षक अभिषेक पृथ्वी यांच्या पथकाने नुकतीच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील विठ्ठला शेतकरी उत्पादक कंपनी तसेच पाचनवडगाव येथील मीरा देवी जिंदल यांच्या शेडनेट व ठिबक शेततळे प्रकल्पाची भेट देऊन पाहणी केली.
POCRA
POCRAAgrowon

जालना : जागतिक बँकेचे (World Bank) लेखा परीक्षक अभिषेक पृथ्वी यांच्या पथकाने नुकतीच जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील विठ्ठला शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Company) तसेच पाचनवडगाव येथील मीरा देवी जिंदल यांच्या शेडनेट व ठिबक शेततळे प्रकल्पाची (Drip Irrigation) भेट देऊन पाहणी केली. प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

POCRA
POCRA : ‘कृषी व्यवसाय’साठी ‘पोकरा’कडून वर्षाची अट

या वेळी आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री राठोड, अजय सुखदेवे या कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोकरा योजनेतून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यावसायिक प्रस्तावांना साहाय्य केले केले जाते. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गट यांना सक्षम करणे तसेच शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे, शेती माल एकत्र करून प्रक्रिया करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

POCRA
'पोकरा' द्वारे अवजारे बँक प्रकल्प

यासाठी पोकरा योजना प्रकल्पातून मदत प्रकल्प म्हणून ६० टक्के अनुदानही देण्यात येते. जालना जिल्ह्यात २८३ गावांची निवड करण्यात आली असून मागील ४ वर्षात प्रकल्पामुळे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामध्ये नवसंजीवनी आली आहे.शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा घटक राबविण्यात येत आहे. शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे, शेती माल एकत्र करून प्रक्रिया करणे.

कृषी उत्पादनाचे संकलन, वर्गीकरण व प्रतवारी केंद्र, गोदाम, फळ पिकवणी केंद्र, कृषी मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शीत वाहन, इत्यादी प्रकारची उद्योग उभारणी या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी जालना यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com