'पोकरा' द्वारे अवजारे बँक प्रकल्प

जालना जिल्ह्यात पोकराच्या माध्यमातून औजारे बँक प्रकल्प
POCRA
POCRAAgrowon

जालना : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कृषी विभाग (Agriculture Department), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आत्मा जालना यांच्या पुढाकारातून नुकताच स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अवजारे बँकेचा (Agriculture Implements Bank) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोकार्पण सोहळ्याला कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची उपस्थिती होती.

POCRA
Mechanization : कृषी यांत्रिकीकरणासाठी किती अनुदान मिळतं ?

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकराच्या माध्यमातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी औजारे बँक प्रकल्प राबविला जातो. पोकरा योजनेतील प्रकल्प सुरू होण्यापूर्वी साधारणपणे एका गावात १-२ ट्रॅक्टर होते. आता औजारे बँकेच्या माध्यमातून एका गावात २ औजारे बँक अनुदानावर वितरित करण्यात आल्या आहेत, या औजारे बँकेत प्रत्येकी २ ट्रॅक्टर एक २७ एचपीपर्यंत व एक २७ एचपी पेक्षा जास्त क्षमता असलेला व १ बीबीएफ पेरणी यंत्र व एक ९ फनी, ७ फनी पेरणी यंत्र असे २ औजारे बँकेत पेरणी यंत्र देण्यात आले.

POCRA
POCRA : ‘पोकरा’अंतर्गत ७९ कोटींवर अनुदान वितरित

ज्या गावात अगोदर पेरणी १८-ते २० दिवस चालायची तीच पेरणी आता केवळ ५ दिवसात होते आहे. पावसाची अनियमितता, असूनही वेळेत पेरणी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान कमी व शेतकऱ्यांच्या खर्चात बऱ्याच मोठया प्रमाणात बचत होते आहे. जालना जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने संजीवनी बनू पाहणाऱ्या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण यांनी केले. जय बाबाजी शेतकरी गट माळशेंद्रा, सर्जेराव पाटील , बोरेश्वर ऍग्रो ,जीवेश्वर ऍग्रो, कृषी कृपा, टी वेदांत एफपीसी, कृशम ऍग्रो इत्यादी शेतकरी उत्पादक कंपनी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे.

-औजारे बँकेचे फायदे

-एकूण मजुरांवरील खर्च कमी होतो.

-पेरणी आणि काढणी वेळेवर करता येते.

-शेतीतील कामाचा वेग वाढला .

-मजुरांअभावी कामांचा खोळंबा होत नाही

-कामाची गुणवत्ता वाढूनमजुर किंवा जनावरांच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी वेळात कामे पूर्ण होतात.

-अन्नधान्याची काढणी आणि मळणी व त्यानंतरची हाताळणी योग्य तऱ्हेने करता येत असल्यामुळे त्यांची नासाडी कमी होते.

-वर्षातून एकाच जमिनीवर एकापेक्षा जास्त वेळा पीक घेणे शक्य झाले

- दोन हंगामातील कमीत कमी उपलब्ध वेळात शेताची मशागत करणे शक्य होते.

जिल्ह्यात अनेक औजारे बँक स्थापन झाल्या असून यामुळे वेळेत पेरणी होऊन वेळेची, मजुरीची,बचत होऊन,नैसर्गिक आपत्ती पासून पिकाचे संरक्षण झाले व शेतकऱ्यांना अल्प दरात सोय निर्माण झाली

- शीतल चव्हाण, प्रकल्प संचालक आत्मा, जालना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com