Agricultural Warehousing : गोदाम उभारणीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन

सद्यःस्थितीत राज्यात सन २०१८ पासून विविध शासकीय योजना व आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे सुमारे २५० टन क्षमतेपासून ते १००० टनांपर्यंत शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांमुळे गोदामांची उभारणी झालेली आहे.
Agricultural Warehousing
Agricultural WarehousingAgrowon
Published on
Updated on

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

शेतकरी कंपनी व सहकारी संस्था (Shetkari Company And Sahakari Sanstha) यांनी गोदाम उभारणी आणि गोदाम पावती व्यवसाय (Warehouse Receipt Business) म्हणून सुरू करताना संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत राज्यात सन २०१८ पासून विविध शासकीय योजना व आंतरराष्ट्रीय प्रकल्पामुळे सुमारे २५० टन क्षमतेपासून ते १००० टनांपर्यंत शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांमुळे गोदामांची उभारणी झालेली आहे.

ही गोदामे एकतर भाड्याने दिलेली आहेत किंवा नाफेडच्या खरेदीसाठी वापरली जात आहेत. तसेच खते, कीडनाशके , बियाणे साठवणूक व विक्रीसाठी उपयोगात आणली जात आहेत. वास्तविक या गोदामांचा उपयोग त्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणूक , गोदाम पावती व विक्री व्यवस्थापन या सेवा देण्यासाठी होणे अपेक्षित आहे.

Agricultural Warehousing
Commercial Crop : व्यावसायिक पिकांत गणेश झाले ‘प्रगतिशील’ शेतकरी

गोदामांची उभारणी सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने होणे अपेक्षित आहे. शासकीय योजनांनी सुद्धा गोदाम उभारणी विषयात संपूर्ण बदल गरजेचे आहे. देशात गोदाम उभारणी करिता योजना अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असून प्रती टन अनुदान अत्यंत कमी आहे. तसेच गोदाम उभारणीच्या प्रती टनाच्या खर्चाची तरतूद कुठेही प्रत्यक्ष खर्चाच्या जवळपासही नाही. राज्यातील शेतकरी कंपनी व सहकारी संस्था यांना गोदाम उभारणीवर काम करणाऱ्या यंत्रणेबाबत माहिती नाही.

Agricultural Warehousing
Mixed Cropping : प्रयत्नपूर्वक शेतीतून समृद्धी अन् समाधान

तसेच गोदाम पावती व्यवसाय विषयक माहिती व मार्गदर्शन करणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाशिवाय महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सुद्धा करण्यात येत आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत स्वतंत्र गोदाम व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून गोदाम व्यवसाय विषयक मार्गदर्शन या कक्षामार्फत केले जाते.

सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडे (www.mahamcdc.com) जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकरीता गोदाम नूतनीकरण, नवीन गोदाम उभारणी, स्वच्छता व प्रतवारी केंद्र उभारणी, गोदामात शेतमालाचे व्यवस्थापन,

गोदामातून शेतमाल विक्री व्यवस्थापन तसेच गोदाम विषयक संपूर्ण व्यवसायाबाबत क्षमता बांधणी व वेळोवेळी मार्गदर्शनासाठी गोदाम व्यवसायातील तज्ज्ञ खासगी संस्थांमार्फत प्रशिक्षण याबाबत कामकाज करण्यात येत आहे. राज्यातील सुमारे १६८ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकरीता गोदाम पावती व्यवसाय उभारणी करिता स्मार्ट प्रकल्पात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाद्वारे पुढील पाच वर्षांसाठी कामकाज करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com