E Peek Pahani :सोंगणी झाली तरी पीक पाहणीचे कवित्व संपेना

‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा, या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या ॲन्ड्रॉइड मोबाइलमधून ॲपद्वारे पिकांच्या फोटोसह अपलोड करण्यासाठी शासनाने मागील वर्षीपासून ई-पीक पाहणी सुरू केली आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

येवला : शासनाने शुद्ध हेतू ठेवून शेतकऱ्यांनीच ॲपद्वारे घरच्याघरी पीक नोंदणी (Crop Registration) करण्याचा चांगला उपक्रम राबविला खरा परंतु ॲपमधील (E Peek Pahani App) त्रुटी, तांत्रिक बिघाड आणि ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण...यामुळे या पीक पाहणीला हरताळ फासला जात आहे. दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकूण जमिनीच्या ३३ टक्के तर पेरणीखालील क्षेत्राच्या ५२ टक्केच पीक नोंदणी झाली आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : पावणेतीन लाख शेतकऱ्यांची ई-पीक नोंद

पुन्हा अद्ययावत आवृत्ती कार्यन्वित करून शनिवारपर्यंत मुदतवाढ दिली होती; मात्र, खरीपातील मूग, मका, भुईमूग, सोयाबीन आदी पिके सोंगणी, काढणी झाली असल्याने आता पीक नोदणीचा हेतू साध्य होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा, या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या ॲन्ड्रॉइड मोबाइलमधून ॲपद्वारे पिकांच्या फोटोसह अपलोड करण्यासाठी शासनाने मागील वर्षीपासून ई-पीक पाहणी सुरू केली आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : त्रेपन्न लाख हेक्टरवर झाली ई-पीक पाहणी

अगोदर वर्षानुवर्षे तलाठ्यांकडून होत असलेल्या पीक पेऱ्यांच्या नोंदीतील त्रुटी दूर व्हाव्यात, ई-पीक पाहणीद्वारे पिकांच्या क्षेत्राची अचूक आकडेवारी उपलब्ध होऊन योजनांची अंमलबजावणी, नुकसान भरपाई, पीकविमा मिळणे अशा व्यापक हेतूने ई-पीक पाहणी उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर पिकाची नोंद असली तरच शासकीय योजनांच्या लाभासह शेतमाल विक्री व विविध प्रकारचे मदतीचा आपत्तीतील नुकसानीच्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो.

E Peek Pahani
E Peek Pahana : ‘ई-पीक’वर २ लाख हेक्टर पिकांची नोंद

त्यामुळे पीक पाहणी अत्यावश्यकच आहे, असे असले तरी ॲपच्या जाचामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी पीक पाहणीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. यावर्षी सुरुवातीपासून नोंदणीला ग्रहण लागले, अनेक शेतकऱ्यांनी तर पहिल्या टप्प्यात ॲपवर पाहणी केली खरी पण तांत्रिक दोषामुळे नोंदणी करूनही उतारे कोरेच आल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता.

या संदर्भात अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने काहीशी सुधारणा करत मुदतवाढ दिली; मात्र हाच कित्ता पुन्हा चालल्याने दोन दिवसांपूर्वी ॲपची नवी आवृत्ती आणून पुन्हा नोंदणीचे आव्हान करण्यात आले आहे. आता ई-पीकपाहणी मोबाइल ॲपची २.०.४ ही अद्ययावत आवृत्ती गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीसाठी शनिवारपर्यंत (ता. २२) मुदतवाढ देण्यात आली होती.

अशी झाली जिल्ह्यात पीकपाहणी (ता. १८ पर्यंत)

एकूण खातेदार - ९ लाख ४४ हजार

एकूण क्षेत्र - १५ लाख ११ हजार ९३२

पेरणी झालेले क्षेत्र - ६ लाख ३९ हजार ४५६

पिक पाहणी केलेले खातेदार - २ लाख ५९ हजार

एकूण पीक पाहणी झालेले क्षेत्र - ४ लाख ९९ हजार ५७३

पाहणीचे टक्के - एकूण क्षेत्रापैकी ३३ टक्के पेरणीखालील क्षेत्रापैकी ५२.४२ टक्के

असा करता येतो ॲपचा वापर

गुगल प्ले स्टोअरवरून ई-पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करावे.

त्यात आपला मोबाईल नंबर टाकून, त्यावर येणारा संकेतांक/पासवर्ड/ओटीपी भरून नोंदणी पूर्ण करावी.

परिचयामध्ये स्वत:चा फोटो अपलोड करून इतर माहिती साठवा.

शेतावर पीक पाहणी करतेवेळी इंटरनेट नसले तरी अडचण नाही. फक्त आपल्या फोनमधील ‘जीपीएस (GPS)’ चालू असावे लागते.

पुढे गावामध्ये जिथे इंटरनेट नेटवर्क उपलब्ध असेल, तिथून पीक पाहणी ॲपमधील अपलोड पर्याय निवडून माहिती अपलोड करावी.

ई-पीक पाहणीच्या अधिक माहितीसाठी गावातील तलाठी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधावा.

ई-पीक पाहणी शेतकरी हिताची आहे.अॅपवरील त्रुटी दूर केल्या असून मुदतवाढ दिली. शासकीय योजना व लाभासाठी उताऱ्यावर पिकांची नोद अत्यावश्यक असून सर्वांनी नोंदणी करावी.
प्रमोद हिले, तहसीलदार, येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com