‘सॉफ्टवेअर’ने अडवले गरिबांचे स्वस्त धान्य

‘ई-पॉस’च्या सॉफ्टवेअर अपडेशनमुळे वितरण रखडले
Ration Shop
Ration ShopAgrowon

नागपूर : ‘एनआयसी’कडून ई-पॉस मशिनच्या सॉफ्टवेअर अपडेशनचे (Software Update) काम हाती घेण्यात आले आहे. पॉस मशिन बोटांचे ठसे गृहीत धरत नसल्याने लाभार्थ्यांना धान्य (Food Grain) मिळण्यास अडचण होत आहे. गरीब लाभार्थ्यांचे धान्य अडले आहे. त्यांना बाहेरून अधिकच्या दरात धान्य खरेदी (Food Grain Purchase) करावे लागत आहे.

Ration Shop
सातारा जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई 

कोरोनापूर्वी अनेक लोक त्यांच्याकडे रेशन कार्ड असतानाही धान्याची उचल करत नसल्याचे चित्र होते. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवांची आस्थापने व शासकीय कार्यालय वगळता इतर सर्व आस्थापना बंद होत्या. परिणामी, नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी तेव्हापासून रेशनवरील धान्य उचल करण्यास सुरुवात केली. आणि आताही करतच आहेत. धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशिन आणण्यात आली. २०१७ पासून सुरू झालेल्या ई-पॉस मशिनचे आता अपडेशन चालू आहे. त्यामुळे ‘एनआयसी’कडून त्यावर धान्य साठाच उपलब्ध नाही.

Ration Shop
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

‘‘मशिनच्या आर. सी. डिटेल्समध्ये सर्व आधार क्रमांक शून्य दाखवत आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक टाकून वितरण करण्याचे पर्याय कार्यरत नाहीत. अशातच स्थानिक प्रशासनाकडूनही अनेक दुकानांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑगस्ट महिन्याचा धान्य साठाही उपलब्ध करून देण्यात आला नाही,’’ असा आरोप विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केला. मशिनवर धान्य साठाच उपलब्ध नसल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण रखडले आहे. त्यामुळे त्यांना वारंवार रेशन दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे.

‘एनआयसी’कडून ई-पॉस मशिनमध्ये सुधारणा करण्यात येतात, तेव्हा त्यांनी पूर्वीच यासंदर्भात सूचना करणे आवश्यक आहे. जेणेकरून, प्रशासन आणि दुकाणदारांसोबतच शिधापत्रिकाधारकांना मन:स्ताप होणार नाही

- संजय पाटील, अध्यक्ष,

विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com