बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

सोलापूर: बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई
Published on
Updated on

सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे सापडलेल्या धान्य साठ्याच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील दुकानांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश शंभरकर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी ही कारवाई केली.

बार्शी तालुक्यातील दोनशे रास्तभाव धान्य दुकानांची दहा मंडल अधिकारी आणि ७८ पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या सहा दुकांनावर कारवाई करण्यात आली. तपासणीत प्रत्यक्ष गावात जावून ४ हजार २०० लोकांचे जबाब घेण्यात आले. त्या जबाबात लोकांनी अंत्येादय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेचे अन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली.  या दुकानदारांचा समावेश 

संतोष गोडसे, उपळाई ठोंगे यांनी परवान्यात नमुद ठिकाणी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी धान्याची साठवणूक केली. महिला दुध उत्पादक संस्था, उंबरगे, यांनी साठा रजिस्टर अद्ययावत ठेवले नाही व वजनकाटा पडताळणी करुन घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करण्यासह पाच हजार रुपये दंड केला. 

नारायण गोरे, चिखर्डे, मोहन सपकाळ, झरेगाव आणि शोभाताई सोपल महिला बचत गट पानगाव यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपात ढिलाई केली. त्यामुळे अनामत रक्कम जप्त करुन परवाना निलंबित करण्यात आला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com