वाशीममध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या धनादेशाचे वाटप

मालेगाव तालुक्यातील सुकंडा येथील प्रियांका खिल्लारे व मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा येथील प्रभाकर वावगे यांना धनादेश वितरित करण्यात आले.
Bhawana Gawali
Bhawana GawaliAgrowon
Published on: 
Updated on: 

वाशीम : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) लाभार्थ्यांच्या वारसाला खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२३) जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील सुकंडा येथील प्रियांका खिल्लारे व मंगरूळपीर तालुक्यातील कंझारा येथील प्रभाकर वावगे यांना धनादेश वितरित करण्यात आले.

Bhawana Gawali
Crop Damage : पाच जिल्ह्यांत पिकांवर संकटांची मालिका कायम

सन २०२२-२३ या वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत मळणी यंत्राच्या अनुदानाचे वाटप वाशीम तालुक्यातील काशिराम कवर, काजळंबा येथील राजाराम सोनटक्के यांना पेरणीयंत्र अनुदानाचे वाटप, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जुमडा येथील शेतकरी गजानन शिंदे यांना ट्रॅक्टर अनुदानाचे वाटप, राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत केकतउमरा येथील शेतकरी परसराम हरिमकर यांना मिनी दालमिल अनुदानाचे वाटप केले.

याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजनेअंतर्गत सावळी येथील लाभार्थी पंचशिला इंगोले यांना पेरणी यंत्राच्या अनुदानाचे वाटप आणि राष्ट्रीय पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत काटा येथील शेतकरी शंकर निंबलकर यांना रोटाव्हेटर अनुदानाचे वाटप करण्यात झाले.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी. एम., जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.