Water Supply Scheme : रानमळा येथे नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन

रानमळा येथे जलजीवन मिशनअंतर्गत १ कोटी ३८ रुपयांचा निधी मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार मोहिते यांच्या हस्ते झाले.
Water scheme
Water schemeAgrowon
Published on
Updated on

कडूस, ता. खेड ः ‘‘गावच्या हद्दीतून गेलेला चास-किवळे रस्ता भविष्यात महामार्ग (Highway) होणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाला (Pune Nashik Highway) पर्याय ठरणाऱ्या या मार्गाचे काम दर्जेदार व्हायला पाहिजे होते. परंतु हे काम अधिकाऱ्यांना पुन्हा करायला लावणार आहे,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते यांनी रानमळा (ता. खेड) येथे केले.

Water scheme
Water Scheme : ‘बोरी-आंबेदरी’ प्रकल्पाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

रानमळा येथे जलजीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission) १ कोटी ३८ रुपयांचा निधी मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार मोहिते यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्रामस्थांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गावच्या हद्दीतून गेलेल्या व सव्वा दोन कोटी रुपये खर्चून झालेल्या चास-किवळे रस्त्याच्या सुमार दर्जाच्या कामाबद्दल आमदार मोहिते यांच्याशी संवाद साधला.

Water scheme
Water Scheme : ‘अमृत योजने’तून दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी

हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, शासनाचा एवढा मोठा निधी वाया गेला आहे. सहा महिन्यांत संपूर्ण रस्त्याला खड्डे भरायला लागले. यावरून कोणत्या दर्जाचे काम झाले आहे, याचा अंदाज करा, अशी खंत आमदार मोहिते यांच्यासमोर ग्रामस्थांनी मांडली. यावेळी या रस्त्याचे काम अधिकाऱ्यांना पुन्हा करायला लावणार असल्याचे आश्‍वासन मोहिते यांनी ग्रामस्थांना दिले.

या वेळी बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, उद्योजक अभिजित शेंडे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच रोहिणी दौंडकर, लता ढमाले, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यादवराव शिंदे, बाजीराव शिंदे, अरविंद दौंडकर, शंकर शिंदे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com