honey tourism
honey tourismAgrowon

Honey Scheme : मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मधमाशापालन उद्योग करण्यास इच्छुक पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना मधमाशापालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Published on

सातारा : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (Madh Kendra Yojana) संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी व बेरोजगारांना रोजगाराची (Employment) नवी संधी आली असून त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केली आहे.

मधमाशापालन उद्योग करण्यास इच्छुक पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना मधमाशापालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मधमाशी पालन उद्योग करण्यासाठी लागणारे मधपेट्या, मधयंत्र व इतर साहित्य खरेदीसाठी लागणारी एकूण रक्कमेच्या ५० टक्के अनुदान व ५० टक्के रक्कम व स्वगुंतवणूक लाभार्थ्यांची असेल. मधपाळांकडून उत्पादित होणारे मध मंडळाकडून हमीभावाने खरेदी करण्यात येईल.

 honey tourism
Honey Portal : मधाच्या नोंदीसाठी ‘मधुक्रांती पोर्टल’

वैयक्तिक मधपाळासाठी पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त. तसेच १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. प्रगतशील मधपाळ (केंद्र चालक) पात्रता किमान १० वी पास वय २१ वर्षापेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नांवे किंवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेतीजमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेती जमीन लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.

तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. लाभार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी मधपेट्या व इतर साहित्याची ५० टक्के स्वगुंतवणूक रक्कम प्रशिक्षणापूर्वी भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com