Crop Damage Compensation : तीन कोटी ४६ लाख अनुदान नुकसानग्रस्तांना वाटप

सततच्या पावसामुळे परभणी तालुक्यातील २ हजार १३८ शेतकऱ्यांच्या ४ हजार १९९ हेक्टरवरील आणि जिंतूर तालुक्यातील ४०७ शेतकऱ्यांच्या २८७ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित परभणी आणि जिंतूर तालुक्यातील ४ हजार ३१५ शेतकऱ्यांना जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल (Crop Damage) ३ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये वाटप (Crop Damage Compensation) करण्यात आले. या बाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

Crop Damage
Cotton Crop Damage : हाती आलेला कापूस वाया जातोय

सततच्या पावसामुळे परभणी तालुक्यातील २ हजार १३८ शेतकऱ्यांच्या ४ हजार १९९ हेक्टरवरील आणि जिंतूर तालुक्यातील ४०७ शेतकऱ्यांच्या २८७ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील, परंतु जून ते ऑगस्ट महिन्यातील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल विशेष बाब म्हणून परभणी आणि जिंतूर या दोन तालुक्यांतील २ हजार ५४५.२५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झालेल्या ४ हजार ४८६ शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत करण्यासाठी राज्य शासनाकडून ३ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला.

Crop Damage
Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

शुक्रवारी (ता. २१) अखेर ३ हजार ३१५ शेतकऱ्यांना ३ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये वाटप करण्यात आले. त्यात परभणी तालुक्यातील ३ हजार ८०८ शेतकऱ्यांना २ कोटी ९० लाख ७६ हजार रुपये आणि जिंतूर तालुक्यातील ५०७ शेतकऱ्यांना ५५ लाख ३९ हजार रुपये निधी वाटप करण्यात आला.

दोन्ही तालुक्यांत शंभर टक्के वाटप पूर्ण झाले आहे. परंतु बँकांना सुट्ट्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे येण्यास वेळ लागत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com