Milk Rate : मानकांतील बदलाने तत्काळ दिलासा नाही

Dairy Farmer : अत्यंत अडचणीतील दूध उत्पादकांना तत्काळ दिलासा द्यायचा असेल तर प्रतिलिटर ठरावीक अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करायला हवे.
Milk Rate
Milk Rateagrowon
Published on
Updated on

Milk Farming : सातत्याच्या नैसर्गिक आपत्ती, चारा तसेच पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाला मिळणाऱ्या कमी दरामुळे दूध उत्पादक हवालदिल झाला आहे. राज्यात दूध दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून दुधाला प्रतिलिटर जवळपास १० रुपयांनी कमी दर मिळतोय.

दूध दरवाढीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गाईचे दूध ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या गुणवत्तेऐवजी यापुढे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ अशा नव्या मानकांनुसार खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे. राज्यातील बहुतांश गाईंच्या जाती ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या गुणवत्तेचे दूध देत नाहीत.

कमी प्रतीचा चारा आणि व्यवस्थापनातील इतर घटकही त्यास कारणीभूत आहेत. या निर्णयाच्या आधी ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ या गुणवत्तेचेच दूध, दूधसंघांना विकता येत होते. परंतु उत्पादकांकडून यापेक्षा कमी गुणवत्तेचे गाईचे दूध यायचे. सहकारी दूध संघांना असे कमी गुणवत्तेचे दूध खरेदीची परवानगी नव्हती.

परंतु खासगी दूध संघ, खासगी कंपन्या कमी गुणवत्तेचे दूध खरेदी करून त्यात पावडरसह इतर काही घटक टाकून त्या दुधाला ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ यामध्ये परावर्तित करून विकत होते. आता या नियमातच शिथिलता आल्यामुळे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफचे दूध स्वीकारले जाणार जाईल. त्यामुळे दूध संघांना गुणवत्तावृद्धीसाठी त्यात कुठलीही भेसळ न करता ते विकता येणार आहे.

Milk Rate
Milk Industry In Maharashtra : दूध प्रक्रिया उद्योगांनीच दुधात टाकला मिठाचा खडा?

असे असले तरी ही प्रक्रिया सोपी, स्वस्त असल्यामुळे यात होणारा फायदा अधिक आहे. असे केल्याने संकलित केलेल्या दुधापेक्षा २५ ते ३० टक्के अधिक दूध उपलब्ध होते. त्यामुळे काही दूध संघ, खासगी कंपन्या दुधात पावडर-पाणी मिसळून अशी भेसळ करणे चालूच ठेवतील. दुधात अशी होणारी भेसळ रोखणारी सक्षम यंत्रणा उभारायला हवी.

त्यात प्रामाणिक अधिकारी नेमावे लागतील. संबंधित यंत्रणेला पुरेसे मनुष्यबळ देखील पुरवावे लागेल. सतत धाडसत्र चालू ठेवून कुठेही दुधात अशी भेसळ होणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. असे केले तरच अशा भेसळयुक्त दुधाचा महापूर थांबून त्याचा दुधाच्या दरावर सकारात्मक परिणाम होईल. परंतु ही दीर्घकाळासाठीची उपाययोजना आहे. यासाठी आत्तापासून प्रामाणिक प्रयत्न झाले तरी पुढील चार-सहा महिन्यांत याचे परिणाम दिसू लागतील.

Milk Rate
Milk Rate : मानकात बदल, दूधदराचे काय? शेतकऱ्यांना पडलाय प्रश्‍न

सध्याचे दूध दराचे संकट हे उत्पादन वाढल्यामुळे आहे. येथून पुढे दीडदोन महिन्यानंतर दुधाचा कृष काळ सुरू होऊन दर वाढू लागतील. गुणवत्तेच्या नियमातील शिथिलतेमुळे भेसळीचे प्रमाण कमी होऊन दूधदर वाढीस दोनतीन महिने लागले तर त्या वेळी कृष काळामुळे दुधाचे उत्पन्न घटून आपोआपच दर वाढलेले असतील. त्यामुळे सध्याच्या संकटात या निर्णयामुळे उत्पादकांना तत्काळ लाभ मिळणार नाही.

अत्यंत अडचणीतील दूध उत्पादकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी प्रतिलिटर ठरावीक अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करायला हवे. अशा प्रकारच्या थेट आर्थिक मदतीने उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. परंतु यात गैरप्रकार करणाऱ्यांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे बऱ्याचदा दूध पावडर तयार करणाऱ्या कंपन्यांना पावडर निर्मिती अथवा निर्यातीसाठी अनुदान दिले जाते.

एकतर दूध पावडर करण्यासाठी स्वस्त दूध आणि पावडर निर्मिती-निर्यातीस अनुदान यामुळे दूध संघ, कंपन्यांचा फायदा होतो. दूध उत्पादकांपर्यंत हा फायदा पोहोचतच नाही. सरकारने ताबडतोब हस्तक्षेप केला नाही तर गोदामात साठलेल्या पावडरमुळे कृष काळ लांबेल.

त्यामुळे दूध पावडर निर्यातीलाही प्रोत्साहन द्यावे लागेल. शासन सुद्धा दूध पावडर खरेदी करून शालेय पोषण आहारात ते मुलांना देऊ शकते. एकीकडे शेतकऱ्यांना प्रतिलिटर ठरावीक अनुदान तर दुसरीकडे दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन दिले तरच उत्पादकांना दिलासा मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com