Milk Rate : दूध उत्पादकांना ‘राजारामबापू’ दर फरक देणार

Dairy Farmer : राजारामबापू पाटील संघाच्या वतीने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधास विनाकपात प्रतिलिटर २ रुपये २० पैसे, गायीच्या दुधास प्रतिलिटर १ रुपया दूध दर फरक, तर दूध संघातील कर्मचाऱ्यांना १८ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केली.
Milk Rate
Milk RateAgrowon

Sangli News : राजारामबापू पाटील संघाच्या वतीने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधास विनाकपात प्रतिलिटर २ रुपये २० पैसे, गायीच्या दुधास प्रतिलिटर १ रुपया दूध दर फरक, तर दूध संघातील कर्मचाऱ्यांना १८ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केली.

पाटील म्हणाले, की संघास पुरवठा करणाऱ्या सेंटर धारकांच्या दूध उत्पादकांनासुद्धा म्हशीच्या दुधास प्रतिलिटर २ रुपये १० पैसे, तर गायीच्या दुधास प्रतिलिटर ९० पैसे दूध दर फरक विनाकपात देणार आहे. हा फरक दूध संस्था सेंटरच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. माजी मंत्री जयंत पाटील, राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल सुरू आहे.

Milk Rate
Gokul Milk Kolhapur : तुकाराम मुंढेच्या आदेशाचा 'गोकुळ'ला तगडा झटका, १ हजार दूध संस्थांवर कारवाई होणार

प्रतिदिन २ लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. संघ विक्रीसह शिल्लक दुधाची पावडर पदार्थनिर्मिती करीत आहे. दूध उत्पादक सभासदांच्या फायद्यासाठी संघाने विविध योजना राबवल्या आहेत. आपल्या भागात म्हशींची संख्या वाढवण्यासाठी गुजरातहून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला बिनव्याजी रक्कम संघामार्फत दिली जाते.

Milk Rate
Cow Milk Rate Gokul : 'गोकुळमधील शिवसेना संचालकांना शेतकऱ्यांपेक्षा मलई महत्त्वाची', शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

यासह रेडी, पाडी अनुदान ३० हजार रुपये दिले जाते, तर गाय कालवड अनुदान ७ हजार ५०० रुपये दिले जाते. रेडी, पाडी यांचे योग्य संगोपन करण्यासाठी २ हजार २५० रुपयांचे अनुदान दिले जाते. १० म्हशी किंवा गायींच्या गोठ्यासाठी अर्थपुरवठा केला जातो. मुक्तसंचार गोठ्यासाठी प्रतिजनावर ३ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते.

चारा बियाणे खरेदीवर ३५ टक्के अनुदान दिले जात आहे. दूध संघात निर्माण होणाऱ्या पशुखाद्याचीही विक्री वाढली आहे. संघाने गत वर्षी ६४० कोटींची उलाढाल केलेली आहे. या वेळी संचालक, सहायक सरव्यवस्थापक पी. डी. साळुंखे, लालासाहेब साळुंखे, आर. एस. पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com