Biodiversity Conservation : संवेदनशील निसर्गप्रेमी

Balanced Development : माधव गाडगीळ यांच्या कामाचा मूळ गाभा असणाऱ्या समतोल विकासाची कास आपल्याला धरावीच लागेल. अन्यथा, विनाश अटळ आहे.
Biodiversity
BiodiversityAgrowon
Published on
Updated on

Environmental Degradation : संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना पश्‍चिम घाटातील जैवविविधतेचे जतन आणि संशोधनाच्या अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात आला आहे.

पृथ्वीतलावरील एकूणच सजीव सृष्टीच्या संवर्धन कार्यातून त्यांची प्रत्यक्ष समाज-समुदाय प्रतिबद्धता याचा विचार हा पुरस्कार जाहीर करताना झाला आहे. यापूर्वी त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण क्षेत्रातील पुरस्कारासह पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. परंतु जागतिक पातळीवरील पर्यावरण क्षेत्रासाठीच्या या सर्वोच्च सन्मानाने त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने नोंद जागतिक पटलावर झाली आहे.

सजीव सृष्टी व भोवतालचा निसर्ग अर्थात परिस्थितिकी (इकॉलॉजी) आणि त्या अनुषंगाने पर्यावरण या विषयाभोवती जीवनभर कार्य करीत राहणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु यातील त्यांचा अभ्यास, आवड आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम सजीव सृष्टीला भोगावे लागू नयेत यासाठीच्या तळमळीतून त्यांना हे शक्य झाले आहे. अगदी तळागाळातील लोकांचा विचार ही त्यांच्या लोकशाहीची संकल्पना आहे.

Biodiversity
Environmental Management : युवकांद्वारे साधू जल-पर्यावरण शाश्वतता

त्यांचे ‘अ वॉक अप द हिल ः लिव्हिंग विथ पिपल ॲण्ड नेचर’ हे इंग्रजी भाषेतील आत्मचरित्र एकाच वेळी नऊ प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. माधव गाडगीळ यांचे वडील धनंजयराव गाडगीळ हे थोर अर्थतज्ज्ञ होते. भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. समाजहितकारक व्यापक कामाचा वारसा त्यांना त्यांच्या वडलांकडून मिळाला आहे.

भारतातील सहा राज्यांत विस्तारलेला पश्‍चिम घाट हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. याची जागतिक वारसा स्थळ म्हणूनही नोंद झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील या भागांवर अनेक प्रकारे अतिक्रमणे होत असताना याची नेमकी काय अवस्था आहे, याच्या संवर्धनासाठी काय करावे लागेल, हे जाणून घेण्यासाठी २०१० मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे माधव गाडगीळ अध्यक्ष होते.

Biodiversity
Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

फार थोडे संशोधक अथवा अभ्यासक हे प्रत्यक्ष फिल्डवर जातात, माधव गाडगीळ त्यापैकीच एक होते. त्यांनी पश्‍चिम घाटाचा संपूर्ण परिसर अक्षरशः पिंजून काढला. तेथील स्थानिक लोक, अभ्यासक, अधिकारी, संस्था यांना भेटून पश्‍चिम घाटाबाबतचा वास्तवदर्शी अहवाल सरकारला सादर केला. त्यात त्यांनी पश्‍चिम घाटाचा बहुतांश भाग हा अतिसंवेदनशील असून तिथे कुठलेही विकास काम करू नये, शेती सेंद्रिय पद्धतीनेच करावी, धरणे बांधू नयेत, खाणकाम करू नये अशा सूचना केल्या होत्या.

परंतु विनाशकारी विकास करणाऱ्या राज्यकर्त्यांना हा अहवाल काही पचनी पडला नाही. विशेष म्हणजे त्यानंतर कस्तुरीरंजन या अवकाश तज्ज्ञाकडून राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार अहवाल तयार करून घेतला. यात पश्‍चिम घाट परिसरातील बहुतांश भागात विकास कामांना सूट देण्यात आली होती. परंतु तोही अहवाल राज्यकर्त्यांनी पूर्णपणे स्वीकारला नाही. आणि जैवविविधतेने समृद्ध पण तेवढ्याच संवेदनशील या परिसरात विनाशकारी विकास जोरात सुरू आहे.

देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्क्यांहूनही कमी क्षेत्र पश्‍चिम घाट परिसराचे आहे. एवढा परिसर सोडून इतरत्र वाट्टेल ते विकास राज्यकर्त्यांना करता येणार आहे. परंतु तसे न करता याच भागाचे लचके तोडले जात असल्याने जैवविविधता, पर्यावरण याबाबत आपण किती असंवेदनशील आहोत, हे स्पष्ट होते.

त्याचे अत्यंत प्रतिकूल परिणाम महापूर, भूस्खलन यांसह इतरही नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून स्थानिक लोकांना आता भोगावे लागत आहेत. यापुढे पर्यावरण विरुद्ध विकास हा संघर्ष वाढत जाणार आहे. अशावेळी माधव गाडगीळ यांच्या कामाचा मूळ गाभा असणाऱ्या समतोल विकासाची कास आपल्याला धरावीच लागेल. अन्यथा विनाश अटळ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com