Online Gambling Addiction: जीवघेणा विळखा

Illegal Betting Issue: कौशल्याचा किंवा नशिबाचा खेळ म्हणून काही ऑनलाइन गेम्सला देण्यात आलेल्या परवानग्यांचा नव्याने विचार व्हायला हवा. अवैध ऑनलाइन जुगार तर पूर्णपणे थांबायलाच हवेत.
Online Game
Online GameAgrowon
Published on
Updated on

Impact of Online Gambling in Indian Villages: राज्यातील कोणत्याही गावात (काही अपवाद वगळता) सकाळ, दुपार, संध्याकाळी असे केव्हाही गेले तर तरुणांचे टोळकेच्या टोळके मोबाइलमध्ये डोके घालून बसलेले दिसतात. काय करीत असतील हे युवक याचा जरा कानोसा घेतला तर त्यातून ऑनलाइन जुगाराचे भयाण वास्तव पुढे येते. जुगार हा फार जुना खेळ आहे. कालपरत्वे जुगाराचे स्वरूपही बदललेले आपल्याला दिसून येते. आज ऑनलाइनच्या जमान्यात तर सर्वत्रच जुगाराचे प्रस्थ वाढले आहे.

ग्रामीण भागात ऑनलाइन जुगाराचा विळखा अधिक घट्ट होत आहे. या व्यसनाबाबत जी भीती व्यक्त केली जात होती, ती आता खरी ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात ऑनलाइन जुगाराने एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याला ऑनलाइन रमी खेळण्याचे व्यसन लागले. या व्यसनातून कर्जबाजारीपणा वाढून नैराश्य आल्याने त्याने आपली पत्नी आणि चिमुकल्या बाळासह जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे.

Online Game
Online Gambling: ग्रामीण महाराष्ट्र जुगाराच्या विळख्यात

मुळातच शेतीचा वाढता उत्पादन खर्च, शेतीमालास मिळणारा कमी भाव यातून शेती तोट्याची ठरत आहे. वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आपले जीवन संपवीत आहेत. त्यात आता जुगाराच्या व्यसनाने शेतकरी आत्महत्या करू लागले तर ही फारच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

ॲड्रॉइड मोबाइल आता प्रत्येकाच्या हातात आहे. त्यास स्वस्तातील इंटरनेटची जोड मिळाली आहे. ऑनलाइन व्यावसायिकांनी तरुणांना भुरळ पाडणारे आकर्षक खेळ डिझाइन केले आहेत. फॅंटसी स्पोर्टच्या नावाखाली चक्क जुगाराला प्रोत्साहन दिले जात आहे. ड्रीम-११, रमी सर्कलसारख्या जुगारांच्या जाहिरातींचा युवकांवर भडिमार सुरू आहे. काहीही न करता घरबसल्या कोट्यवधी रुपये कमाईचे आमिष या जुगारातून दाखविले जाते. त्यामुळे अशा जुगाराच्या आहारी तरूण जातात.

Online Game
Farmer Issue: जुगारामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

अगदी घरात, गावातील चौकात बसून हा जुगार रोजरोसपणे खेळला जात आहे. ऑनलाइन जुगाराबाबत कायदेशीर स्पष्टता दिसत नाही. अनेक विदेशी जुगार वेबसाइट, ॲप्स यांत असून यावर कोणाचेही नियमन नाही, तर काही जुगार ‘टॅक्स हेवन’मधून (कर सवलत) चालविले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जाते. जुगार आणि बेटिंग बरोबर शेअर्स मार्केट ट्रेडिंगच्या जाळ्यातही तरुणाई अडकत जात आहे.या सगळ्यांचा शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

तरुणाईला ऑनलाइन जुगाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने यांत कायदेशीर स्पष्टता आणायला हवी. कौशल्याचा किंवा नशिबाचा खेळ म्हणून काही ऑनलाइन गेम्सला देण्यात आलेल्या परवानग्यांचा नव्याने विचार व्हायला हवा.

अवैध ऑनलाइन जुगार पूर्णपणे थांबायलाच हवेत. ऑनलाइन जुगारावर वैयक्तिकऐवजी सामुदायिक नियंत्रण प्रभावी ठरू शकते. मुलांना मोबाइल द्यायचा नाही, किंवा ठरावीक वेळेतच त्यांना मोबाइल देण्याचा ठराव काही ग्रामपंचायती करीत आहेत.

त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. अशा ठरावांची व्याप्ती वाढवायला हवी. शेती तोट्याची ठरतेय आणि पर्यायी रोजगार गावात उपलब्ध नसल्यानेही ऑनलाइन जुगाराचे प्रमाण वाढत असताना शेती किफायती ठरणारी, गावात रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या धोरणांचा अवलंब व्हायला हवा. व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर खोलवर परिणाम करणाऱ्या हानिकारक खेळापासून दूर राहण्याचा निर्धार हा तरुणांनी देखील करायला हवा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com