Farmer Issue: जुगारामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Gambling Addiction: ऑनलाइन रमी खेळण्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज आहे. तर पत्नी, चिमुकला मुलगा या दोघांचे संशयास्पद मृतदेह आढळले आहेत.
Tejaswini Jadhav, Laxman Jadhav and Shivansh Jadhav
Tejaswini Jadhav, Laxman Jadhav and Shivansh JadhavAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News: ऑनलाइन रमी खेळण्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज आहे. तर पत्नी, चिमुकला मुलगा या दोघांचे संशयास्पद मृतदेह आढळले आहेत. ही घटना सोमवारी (ता. १६) धाराशीव तालुक्यातील बावी येथे घडली आहे.

लक्ष्मण मारुती जाधव (वय २९), तेजस्विनी लक्ष्मण जाधव (वय २२), शिवांश लक्ष्मण जाधव (वय दोन) अशी मृतदेह आढळून आलेल्या तिघांची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सकाळी दहा वाजून गेले, तरी लक्ष्मण यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली.

Tejaswini Jadhav, Laxman Jadhav and Shivansh Jadhav
Farmer Family Issue: आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे काय?

त्यानंतर काही ग्रामस्थांनी याची माहिती धाराशीव ग्रामीण पोलिस ठाण्याला कळविली. त्यानंतर काही वेळातच पोलिस निरीक्षक एम. एन. शेळके तेथे दाखल झाले. दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर पलंगावर तेजस्विनी व शिवांश यांचे मृतदेह आढळले, तर लक्ष्मण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी बावी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

Tejaswini Jadhav, Laxman Jadhav and Shivansh Jadhav
Farmer Issue: शोषणमुक्तीतून थांबतील आत्महत्या

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मणला ऑनलाइन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. या रमीच्या नादात त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. कर्जाच्या परतफेडीसाठी त्याने स्वतःच्या हिश्शाला आलेली वडिलोपार्जित एक एकर शेती आणि गावातीलच एक प्लॉटही विकला होता. शेती व प्लॉटची विक्री करूनही तो कर्जमुक्त झाला नाही. या कर्जबाजारीपणातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, दोन वर्षीय मुलगा आणि पत्नीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा पोलिस तपास करत आहेत.

बावी येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी आकस्मात मृत्यू म्हणून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. कर्जबाजारीपणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
एम. एन. शेळके, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस स्थानक, धाराशिव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com