Education System : शिक्षण कृतिशील उपक्रमांतून...

Indian Education : राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुषंगाने विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण आणि जीवनानुभव देऊन स्वावलंबी होण्यासाठी विविध कृतिशील उपक्रमांद्वारे प्रेरित करण्यात येत आहे.
Education
Education Agrowon
Published on
Updated on

National Education Policy : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आठवडाभर प्रत्येक दिवशी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि संबंधित यंत्रणेला उपक्रम अंमलबजावणीचे आदेश दिलेले आहेत.

त्यानुसार प्रत्येक शाळेत कृतिशील उपक्रम दर दिवशी पार पाडले जात आहेत. यामध्ये अध्ययन-अध्यापन साहित्य वापर आणि उपयोग, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता, क्रीडा उपक्रम पार पडलेले असून, यानंतर २८ जुलैपर्यंत सांस्कृतिक उपक्रम, कौशल्ये व डिजिटल उपक्रम, मिशन लाइफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब आणि समुदाय सहभाग दिवस असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.

Education
Education System : गरज शिक्षण व्यवस्थेच्या पुनरुत्थानाची

हे उपक्रम अगदी बालवाडी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी-शिक्षक-धोरणकर्ते, भागधारक आणि समाज यांच्या परस्पर सहकार्यातून राबविले जातील. प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे उपक्रम देण्यात आलेले आहेत.

पायाभूत स्तरामध्ये अंगणवाडी ते इयत्ता दुसरी, पूर्वतयारी स्तरामध्ये तिसरी ते पाचवी, पूर्वमाध्यमिक व माध्यमिक स्तरांमध्ये इयत्ता सहावी ते दहावी आणि उच्च माध्यमिक स्तरामध्ये अकरावी आणि बारावी अशा चार स्तरांवर नावीन्यपूर्ण व कल्पक उपक्रम असतील.

त्यातून राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुषंगाने विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण आणि जीवनानुभव देऊन स्वावलंबनासाठी प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांना गावातील आणि शहरातील सेवा केंद्रांची माहिती यानिमित्ताने होणार आहे.

बँका, पोलिस स्टेशन, ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक केंद्र, अग्निशामक दल, लघुउद्योग, क्रीडांगणे आणि खेळ प्रकार, संगणक केंद्र, पाणीपुरवठा केंद्र, आरोग्य सेवा आदींची अनुभूती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. निसर्गातील सफर आणि आनंद विद्यार्थ्यांना लाभत आहे.

Education
Right To Education : शिक्षण हक्क कायद्याच्या नियमांत बदल का केला?

विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ‘वाचन चळवळ’ महत्त्वाची आहे, हे शिक्षणकर्त्यांना कळालेले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात भ्रमणध्वनी-संगणकामुळे वाचनाची सवय आणि सराव तुटत आहे. वर्गवाचनातून विद्यार्थ्यांना योग्य आरोह आणि अवरोहासह गतीवाचन, समजपूर्वक वाचन आणि वाचलेल्या साहित्यावर अभिव्यक्ती करण्यासाठी सजग वाचन याकडे शिक्षकांनी नेेणे अपेक्षित आहे.

यानिमित्ताने विद्यार्थ्यांची स्वतःची अभिरुची विकसित होईल. स्वतःच्या आत डोकावत चिंतनाच्या पातळीवर जाण्यासाठी असे उपक्रम साह्यभूत आहेत. विद्यार्थी दशेपासून वाचनाचा पाया पक्का करून भविष्यात कसदार लेखकापर्यंतचा प्रवास शक्य होईल. ज्ञान-माहिती-आकलन आणि संशोधन या विविध पातळ्यांवर वाचनाची बैठक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल.

आयुष्याचा ताल आणि तोल सांभाळण्यासाठी आणि आपला एकूणच भोवताल जाणण्यासाठी पुस्तके ‘मित्र’ असतात. नव्या जगाची जाणीव आणि अनुभवांची शिदोरी पुस्तके देतात. बालसाहित्याचा खजिना विद्यार्थ्यांना समृद्ध करतो. या सगळ्या वर्तमान आणि भविष्यातील दूरगामी गोष्टींचा बारीकसारीक विचार करून ‘वाचक विद्यार्थी’ वाचन उपक्रमातून घडत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांना लेखनाची संधी देत आहेत. शिक्षण क्षेत्रातील हेरंब कुलकर्णी, गंगा बाकले, विनोद शेंडगे, भाऊसाहेब चासकर, अरुण चव्हाळ, युवराज माने यांच्यासारख्या अनेकांनी विद्यार्थ्यांचे वाचन उपक्रम, ई-मासिके, बालवाचक मेळावे, विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन आयोजित करून दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. या अशा शिक्षणातून शिक्षणामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये होणारे हे विधायक बदल निश्‍चितच स्वागतार्ह आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com