फोन टॅपिंगमध्ये फडणवीसांचाही हात ?

फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे, अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात असणे स्वाभाविक आहे. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट्द्वारे केली आहे.
devendra-fadnavis
devendra-fadnavis
Published on: 
Updated on: 

बेकायदा फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन  (commissioner of police) पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसकडून तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra-fadnavis) यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या मागणीमुळे यामुळे एकच खळबळ उडाली असून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे.   

रश्मी शुक्ला यांच्यावर शनिवारी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांच्यानंतर गृह खात्याचे तत्कालीन कारभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस (devendra-fadnavis) यांची भूमिका तपासण्याचा आग्रह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धरला आहे. त्यामुळे या मुद्यावरून सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. pic.twitter.com/eDCq1PyixQ

— Nana Patole (@NANA_PATOLE)

फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे, अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात असणे स्वाभाविक आहे. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट्द्वारे केली आहे. तसेच, नाना पटोले यांनी ट्वीटसोबत फोन टॅपिंगसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या काय सूचना आहेत, हे देखील एका माहितीपत्रकाद्वारे आपल्या ट्वीटमध्ये दर्शवले आहे.

व्हिडीओ पहा- 

भारतीय तार अधिनियम कलम २६ अनुसार रश्मी शुक्ला तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दिली. शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागात (स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट-एसआयडी) आयुक्त होत्या. त्यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली (state appointed committee) उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती.

उच्चस्तरीय समितीचा (state appointed committee) अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही पदाचा गैरवापर करून बेकायदा फोन टॅपिंग केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करणार-  गृहमंत्री वळसे-पाटील रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली. ज्यामध्ये नाना पटोले-अमजद खान, बच्चू कडू-निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे, तरबेज सुतार, आशिष देशमुख-रघु चोरगे अशाप्रकारची नावे देण्यात आली. सखोल चौकशी केल्यानंतरच रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिका-याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते. रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.