Maharashtra New Opposition Leader : अखेर ठरलं... विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची निवड, तर गटनेतेपदी बाळासाहेब थोरात कायम

Congress Leader Vijay Wadettiwar : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात आले. काँग्रेस हायकमांडने मंगळवारी ही घोषणा केली.
Vijay Vadettivar
Vijay VadettivarAgrowon
Published on
Updated on

Leader of the Opposition : राज्यात मागील काही वर्षापासून राजकीय भूकंपावर भूकंप होत आहेत. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना धक्क्यावर धक्के देत आहे. एक वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे विधान सभेतील संख्याबळ कमी झाल्याने विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता होती. या पदासाठी काॅंग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक होते. परंतु काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. तसेच बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसच्या गटनेतेपदी कायम ठेवले आहे.

गेल्या महिन्यात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचे अजित पवार यांना समर्थन आहे. त्यामुळे विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांचे नाव सुचण्यात आले होते. परंतू त्यांचे संख्याबळ कमी होते. तर विरोधी बाकावर काॅंग्रेसच्या आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला जात होता.

Vijay Vadettivar
Maharashtra Monsoon Session 2023 : विरोधी पक्षनेत्याविना पावसाळी अधिवेशन

विधानसभेत ४५ आमदार असलेला काँग्रेस पक्षामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक जण दावेकर होते. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे आदी नेत्यांची नावे चर्चेत होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेन सुरु होऊन दोन आठवडे झाले. मात्र, विरोधी पक्षनेते पदाचे नाव निश्चित झाले नव्हते. दरम्यान, आज (ता. १ आॅगस्ट) काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी विजय वड्डेटीवार यांच्या पारड्यात वजन टाकून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

कोण आहे विजय वड्डेटीवार

मूळचे शिवसैनिक आणि भाजपचे कट्टर विरोधक अशी विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. ते काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन खाते संभाळले आहे. २०१९ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची पक्षातील उंचीही वाढली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com