Sugar Market: ऊस हंगामात उत्तर प्रदेशची महाराष्ट्राला सर्वच पातळ्यांवर धोबीपछाड

Sugar Production : साखर उत्पादनात यंदा उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. महाराष्ट्रात यंदा २१० साखर कारखान्यांनी गाळप केले तर उत्तर प्रदेशात केवळ ११८ कारखाने सुरु होते.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Sugar Market Rate : साखर उत्पादनात यंदा उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. महाराष्ट्रात यंदा २१० साखर कारखान्यांनी गाळप केले तर उत्तर प्रदेशात केवळ ११८ कारखाने सुरु होते. यंदा केवळ साखर उत्पादनातच नाही तर सर्वच पातळ्यांवर उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला पछाडले, असे उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखाना मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले.

Sugar Market
Sugar Season : देशातील चार कारखान्यांचा गळीत हंगाम जानेवारी अखेरीच आटोपला; राज्यातील गाळपाची स्थिती काय?

उत्तर प्रदेशात यंदा १०७ लाख टन साखर उत्पादन झाले. तर महाराष्ट्रात १०५ लाख टनांवरच उत्पादन स्थिरावले. यंदा उत्तर प्रदेशात २८ लाख ५३ हजार हेक्टरवर ऊस होता. तर तर महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्र १४ लाख ८७ हजार हेक्टर होते. या उसाचा गाळप हंगाम ऑक्टोबर ते जून या काळात असतो. उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादन यंदा २ हजार ३४८ लाख टनांवर पोचले. तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादन १ हजार ४१३ लाख टनांवर पोचल, असेही मंत्री चौधरी यांनी सांगितले.

Sugar Market
Sugarcane Payment : ऊस उत्पादकांची देयके पंधरा दिवसांत द्या ; अन्यथा आंदोलन

चालू हंगामात उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १ हजार ८४ लाख टन उसाचे गाळप केले. तर महाराष्ट्रात १ हजार ५३ लाख टन उस गाळप झाले. इथेनाॅलचा विचार करता उत्तर प्रदेशात जवळपास २० लाख टन साखर इथेनाॅल निर्मितीसाठी गेली. तर महाराष्ट्रात १६ लाख टन साखरेचा वापर इथेनाॅल निर्मितीसाठी झाला. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात साखर उद्योगाचा विस्तार झाला. कारखाने अधिक आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची संख्या २४६ आहे तर उत्तर उत्तर प्रदेशात १५७ कारखाने आहेत, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. 

चालू हंगामात महाराष्ट्रात २१० साखर कारखान्यांनी गाळपर केले. तर उत्तर प्रदेशात केवळ ११८ कारखाने सुरु होते. उत्तर प्रदेशातील ८० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांनी १०० टक्के पेमेंट दिले आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत २८ हजार ४९४ कोटी रुपयांची एफआरपी मिळाली. मागील सहा वर्षांमध्ये राज्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांना २ लाख ११ हजार ७०० कोटी रुपयांची एफआरपी अदा केली आहे. १२ साखर कारखाने विकले गेले तर १८ कारखाने बंद झाले. राज्यात योगी आदीत्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने काही नवीन कारखानेही सुरु केले आहेत, असेही चौधरी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com