बचत गटांतील महिलांना मिळणार मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणाऱ्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
Under this scheme of self help group women will get subsidy on mini tractor
Under this scheme of self help group women will get subsidy on mini tractor
Published on
Updated on

बचत गटांचे (self help group) आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना ९० टक्के शासकीय अनुदानावर (subsidy) ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी (horse power) ट्रॅक्टर (tractor) व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर (cultivator) किंवा रोटाव्हेटर (rotavator) यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

विभाग - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

योजनेचे नाव- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत

लाभार्थी- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी

लाभाचे स्वरुप- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने

आवश्यक कागदपत्रे – सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या तीन अटी खालीलप्रमाणे आहेत.

- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- संबंधित बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३.५० लाख (तीन लाख पन्नास हजार फक्त) इतकी राहील, बचतगटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान देय राहिल.

संपर्क- संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.

वेव साईट- https://sjsa.maharashtra.gov.in

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com