
Solapur News : जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम नऊ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप सोहळ्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो
चारुशीला देशमुख, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर क्षमा यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. आशीर्वाद म्हणाले, की प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शीला फलक लावण्यात येणार आहेत. त्या फलकावर वीरांच्या नावासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे व नावे निश्चित करावीत. तालुकास्तरावर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी चोखपणे आपली भूमिका बजावावी. नेहरू युवा केंद्राच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग या कार्यक्रम कालावधीत घ्यावा, सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी तालुका स्तरावर स्वतंत्र बैठका घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन करावे, जिल्ह्यात अमृत सरोवरांची संख्या १४३ असून, या सर्व सरोवर ठिकाणी रोज स्तंभ उभारून ध्वजारोहण करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरी भागात हे कार्यक्रम घेण्यात येतील. या अंतर्गत मिट्टी यात्रा हा एक कार्यक्रम होणार असून, त्याअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक गावातून एका कलशामध्ये माती घेऊन तो कलश पंचायत समिती
स्तरावरील कार्यक्रमाच्या ठिकाणी आणली जाईल. तसेच जिल्ह्याच्या ११ पंचायत समिती ठिकाणाहून ११ कलश देश पातळीवरील कार्यक्रमासाठी पाठवण्यात येतील. देश पातळीवरील मुख्य कार्यक्रम नवी दिल्ली येथे होणार आहे. मिट्टी यात्रा अंतर्गत संपूर्ण देशभरातून आलेले कलशामधील माती ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अमृतवाटिका तयार करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्रीमती चारुशिला देशमुख यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.