Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात चार लाखांवर शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

Solapur Crop Insurance : या योजनेला सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत तब्बल ४ लाख १९ हजार ७७३ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी खरिपातील पिकासाठी विमा उतरला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Solapur News : राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याचा सोय केली आहे. या योजनेला सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत तब्बल ४ लाख १९ हजार ७७३ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी खरिपातील पिकासाठी विमा उतरला आहे.

पण विमा पोर्टलच्या संथगतीने आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत विमा भरण्याची शेवटची मुदत आहे. या दोन दिवसांत ही संख्या आणखी वाढणार आहे.

सोलापूर जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जात होता. पण अलीकडच्या काही वर्षांपासून खरीपातही मोठ्या प्रमाणात पिके घेतली जात आहेत. त्यातही सोयाबीन, तूर, कांदा, उडीद या पिकांचा सर्वाधिक समावेश आहे.

त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वरचेवर वाढत आहे. त्यातच यावर्षी खरीप हंगामात एक रुपयात विमा भरण्याची सोय शासनाने केल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे.

Crop Insurance
Crop Insurance : मराठवाड्यात ४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रे, आपले सरकार सेवा केंद्रे यासारख्या सुविधा केंद्रांवर शेतकऱ्यांची विमा भरण्यासाठी गर्दी होते आहे. पण एकाच वेळी सर्व भागांतून विमा भरला जात असल्याने विम्याचे पोर्टल संथगतीने चालत आहे. अनेक वेळा तांत्रिक अडचणीही येत आहेत. त्यामुळे विमा भरण्याची गती कमी झाली आहे. पण या अडचणीतूनही शेतकरी विमा भरण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

Crop Insurance
Crop Insurance : मराठवाड्यात ४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

सोयाबीनसाठी सर्वाधिक विमा

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून सर्वाधिक ८७ हजार ८०५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातून २० हजार ५३३ अर्जांचा समावेश आहे. उत्तर सोलापुरातून १२ हजार ३३३, दक्षिण सोलापुरातून ७ हजार ७६७ आणि मोहोळ तालुक्यातून ७ हजार ६५१ अर्ज दाखल झाले आहेत.

बाकी अन्य उर्वरित अर्ज माळशिरस, सांगोला, पंढरपूर, करमाळा, माढा, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे आहेत. पण एकूण पिकविम्याच्या अर्जात सर्वाधिक सोयाबीनसाठी १ लाख ३६ हजार ८९ अर्जाचा समावेश आहे.

गतवर्षीच्या तुलनेत चौपट अर्ज

आतापर्यंत पीकविम्यासाठी प्रत्येक पीकनिहाय विमा हप्त्याची रक्कम वेगवेगळी घेतली जात होती. गेल्या वर्षी खरिपामध्ये जिल्ह्यातून केवळ एक लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांनी विमा भरला होता.

पण यंदा आतापर्यंत तब्बल ४ लाख १९ हजार ७७३ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. अर्थात, ही संख्या सध्या तरी चौपट वाढली आहे. एक रुपयात विमा भरण्याची सोय केल्याने शेतकऱ्यांचा कल विमा भरण्याकडे अधिक राहिल्याचे दिसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com